सरपंच संघटनेचे खासदार पटेलांना निवेदन

0
6

गोंदिया ,दि.१८ःःग्राम पंचायतीच्या विविध समस्यांना घेवून सरपंच संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. दरम्यान विविध समस्या व मागण्यांचे निवेदन सादर केले.
ग्राम पंचायतील समस्या व सरपंचांना होणारे त्रास यामुळे सरपंचाना गाव विकासात अडचण येत आहे. सरपंचाना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. समस्यांचे निराकरण करण्यात शासन उदासीन असल्याचे दिसून येत. समस्यांना वाचा फोडावी म्हणून सरपंच संघटनेचे पदाधिकारी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. दरम्यान समस्या खासदार पटेलांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सरपंचांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सहयोग करणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या अधिवेशनात मनरेगा व ग्रामपंचायत अंतर्गत संगणक प्रशिक्षक या विषयी संसदेत मुद्दा उपस्थित करु असेही आश्‍वासन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिले.
यावेळी पुरुषोत्तम घोगरे, बाबासाहेब पावसे पाटील, राज्य उपाध्यक्ष ससेद्रंजी भगत, विदर्भ प्रसिध्दी प्रमुख विकाश ढेंगे, जिल्हाध्यक्ष कमल येरणे, सरपंच/उपसरपंच संघटनेचे मुनेश रहांगडाले, जिल्हा महासचिव नीतीन टेंभरे, दिनेश कोरे, रामनाथ वह्राडे, संग्रामे, व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी संघटनेतर्पेष्ठ मुनेश रहांगडाले यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले.