जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गौरवास्पद काम :खा. मधुकर कुकडे

0
15
भंडारा ,दि.२० :: अत्याधुनिक सेवा सुविधा शेतकर्‍यांना मिळाव्यात, याकरीता बँकेचे काम गौरवास्पद आहे.२४ तास एटीएम सेवेमुळे शेतकर्‍यांच्या वेळेत बचत होऊन जगाच्या स्पर्धेत शेतकरी उभा राहायला जिल्हा बँक मदत शेतकर्‍यांना करीत आहे.  जिल्हा मध्यवर्ती बँक खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याची व विकासात्मक दिशा देणारी ‘रली आहे. पीक कर्जाचे झालेले वाटप बघता बँक शेतकर्‍यांच्या दारात समाधानाने उभी आहे, असे प्रतिपादन खा. मधुकर कुकडे यांनी केले.
पालांदूरात मध्यवर्ती बँकेच्या एटीएमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी खासदार तथा राष्ट्रीय किसान संघाचे अध्यक्ष नाना पटोले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, पालक संचालक विनायक बुरडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, संचालक सत्यवान हुकरे, ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, सरपंच जितेंद्र कुरेकार, सरव्यवस्थापक संजय बरडे, जि.प. माजी सदस्य भरत खंडाईत, शाळा व्यवस्थापक नरेंद्र ढोरे, हेमराज कापसे, इद्रिस लध्धानी, जि.प.सदस्य के.के. पंचबुध्दे, पं.स. सदस्य विजय कापसे, संचालक प्रेमसागर गणविर, बँक अधिकारी राजेश मदान उपस्थित होते.
पालक संचालक विनायक बुरडे व माजी जि.प. सदस्य भरत खंडाईत यांच्या हस्ते सुनिल फुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाल व श्रीफळ देवून सन्मानसोहळा पार पडला. नाना पटोले व सुनिल फुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एटीएममधून रोख काढून लोकार्पण करण्यात आले. उपस्थितांनी लगेच एटीएम सेवेचा लाभ घेणे सुरू केले. प्रास्ताविक पालक संचालक विनायक बुरडे यांनी केले.
याप्रसंगी नाना पटोले यांनी इंधन दरवाढीतून दररोज किमान सामान्यांच्या खिशातून पन्नास रूपये उकळत असल्याचे सांगत धानाला ३१५० रूपये एवढा समर्थन मुल्य अपेक्षीत असताना केवळ १७५० एवढाच दर सरकार देत आहे. ही शेतकर्‍यांची आर्थिक लुट आहे.सुनिल फुंडे यांनी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या बँक प्रणालीवर टिका करीत सत्ताधारी सरकार कर्जमाफी देवूच शकत नसल्याची जोरदार टिका करीत शेतकरी विरोधी धोरणाने शेतकरी संकटात आला आहे.संचालक सुधन्वा चेटूले यांनी तर आभार पालक संचालक विनायक बुरडे यांनी केले. कार्यक्रमाला नरेंद्र मोरे, खेमचंद हटवार, छोटू मेहर, अमोल कापसे, कैलाश भेंडारकर, मुखरू बागडे, प्रमोद खंडाईत जनरल मॅनेजर संजय बुरडे उपस्थित होते.