भंडारा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करा : धनराज साठवणे

0
12

भंडारा,दि. २९: : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे तसेच पेंच प्रकल्पाचे पाणी न मिळाल्याने शेतकºयांच्या शेतातील धान पिक पुर्णपणे करपले असुन मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे करीता भंडारा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात यावा अशी मागणी कॉंगे्रसचे नेते धनराज साठवणे यांनी निवेदनातुन केली आहे. पावसाअभावी भंडारा तालुक्यातील शेतपिकांच मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.भंडारा तालुक्यातील पांढराबोडी, सिरसी, केसलवाडा परिसरातील शेतकºयांचे पेंच प्रकल्प कार्यालय विभागाशी करारनामा असुन भंडारा तालुका हा शेवटचा भाग असल्याने शासनाच्या नियमानुसार रामटेक पेंच प्रकल्पाचे पाणी येथील शेतकºयांना मिळणे गरजेचे होमे.मात्र तसे न झाल्याने शासनाला अनेकदा निवेदन देत आंदोलनही करण्यात आले मात्र तरिसुध्दा शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.

परिणामी पाण्याअभावी शेतकºयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. करिता शासकीय यंत्रणेच्या मध्यमातून धानाचे सर्व्हे (निरीक्षण) करून भंडारा तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करावा अशी मागणी भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी कॉंगे्रस नेते धनराज साठवणे, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे,धर्मेंद्र गणवीर,कमल साठवणे,कोमल कळंबे,जीवन भजनकर,संजय वाघमारे, पृथ्वी तांडेकर,गणेश लिमजे,हिरामण लांजेवार,सचिन फाले, कैलास केवट, दिलीप मेश्राम,हेमचंद भुरे,भगवान गणवीर, अशोक निमकर,सदानंद मोहतुरे,मिलिंद जोशी,विनायक दिवटे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.