एनएसयुआयने केला भाजपा सरकारचा निषेध

0
7

गोंदिया,दि.06 : भाजपा सरकार केंद्रात सत्तेवर येऊन चार वर्षे झालीत. मात्र मोदी सरकारने केलेल्या घोषणेनुसार दरवर्षी युवकांना दोन कोटी नोकऱ्या देऊ असे दिलेले आश्वासन फोल ठरले. तेव्हा त्यांच्या फसव्या घोषणेमुळे एनएसयुआयने भाजपा सरकारचा निषेध केला.भाजपाने सत्तेत येण्याअगोदर देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत येताच भाजपा युवकांना नोकऱ्या देणे दूरच भाजपा सरकारच्या बोगस कार्यप्रणालीमुळे शिक्षण निधीसुद्धा बंद करण्यात आला. तेव्हा भाजपा सरकारच्या कार्यप्रणालीचा एनएसयुआयच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. यावेळी एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप रहांगडाले, निकेतन अंबादे, हरीश तुळस्कर, रोहन रंगारी, सुमित महावत, कार्तिक भेलावे, तैसीम शाहा, निक्की येडे, अभिजित रघुवंशी, राहुल बावनथडे, शुभम शहारे, गौरव चन्नेकर, रोहित वैद्य, सन्नी भोयर, अविनाश नागपुरे, पीयूष बिडकर, नीलकंठ दमाहे, क्रिष्णा पालांदूरकर, अनिकेत खांडेकर, जयंत भोंडेकर, निक्रम यादव व अन्य उपस्थित होते..