ग्रामीण भागातही होणार हेल्मेटसक्ती

0
8

गोंदिया,दि.06 : सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे व राज्य शासनाच्या गृह विभागाच्या परित्रकाप्रमाणे मोटारवाहन अधिनियम १९८८ चे कलम १२९ अन्वये राज्याच्या संपूर्ण क्षेत्रात मोटारसायकल चालविणाऱ्या किंवा तिच्यावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवितांना हेल्मेट वापरले पाहिजे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्ते अपघातास आळा बसविण्यासाठी १२ नोव्हेंबरपासून गोंदिया जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट न परिधान करणाऱ्या वाहन चालकांविरूद्ध तसेच चारचाकी वाहन चालवितांना सिट बेल्ट न वापरणाऱ्या वाहन चालकांविरूद्ध मोटार वाहन कायद्यातंर्गत प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.यापुढे गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांच्या ताब्यातील वाहन चालविताना स्वत:चे तथा जनमाणसांची जीवितहानी होऊ नये किंवा गंभीर दुखापत होऊ नये याकरिता हेल्मेट परिधान करणे, सिट बेल्टचा वापर करणे, ट्रिपल सिट वाहन न चालविणे, वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर न करणे तसेच संबंधित आवश्यक दस्तावेज सोबत बाळगणे अनिवार्य आहे. सदर वाहतूक निर्देशित आदेशाचा भंग केल्यास संबंधित मोटार वाहन कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी कळविले आहे..