भुराटोल्यातील चंदन तलावात आ.रहागंडालेच्या हस्ते जलपुजन

0
12

तिरोडा,दि.१२ः- सिंचन क्षेत्रावर विशेष भर देऊन मागील वीस वर्षापासून रखडलेले प्रकल्प आमदार विजय रहांगडाले यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत मार्गी लावण्यात यश प्राप्त केले.याची प्रचिती म्हणजे भुराटोला येथील चंदन तलावातील लघु प्रकल्प. हा प्रकल्प गेल्या २५ वषार्पासून शासनाकडे प्रलंबित असून याकडे सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. परंतु त्यांना या प्रकल्पाला गती आणता आलेली नाही. तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी धापेवाडा उपसा सिंचन या सिंचन प्रकल्पाबरोबरच भुराटोला लघु प्रकल्पावर विशेषर भर देत शासनाकडे सदर प्रकल्प पूर्ण करण्याविषयी मागणी करीत सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून २३ कोटी शासनाकडून मंजूर करवून घेतले.
या कामाचे मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर भूमिपूजन केलेले होते. या प्रकल्पातंर्गत तिरोड्यावरून ५ किमी अंतरावर भुराटोला गावाजवळील चंदन तलावातील पाणी उजवा कालवा २.८५ किमी व डावा कालवा १.५ मीटर आजून पाईपलाईनव्दारे परिसरातील ४८९ हेक्टर शेतीला पाणीपुरवठा केला जाणार आहे. या तलावात सद्यस्थितीत १.७८४ दलघमी पाणीसाठा झालेला असून या प्रकल्पाचा पालडोंगरी, सिंदीटोला, करटी बु., करटी खुर्द, चिरेखनी, जमुनिया, बेरडीपार, काचेवानी आदि गावातील जमिल सिंचित होणारा जलसाठा १०० टक्के झाल्याने नुकतेच आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झाले.
कार्यक्रमाला माजी आमदार भजनदास वैद्य, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, पं.स.सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, पवन पटले, डॉ.वसंत भगत, प्रभुदास सोनेवाने, दवनीवाडा मंडळ अध्यक्ष पप्पु अटरे, सुरेश पटले, अजाब रिनाईत, थानसिंग रहांगडाले, सुधा घरजारे, तिलोत्तम चौरे, संगीता पुराम, वर्षा मालाधरी तसेच उपसा सिंचनचे कार्य अभियंता पृथ्वीराज फालके, निखिल अहिरराव, किरण मुनगीरवार, राधेश्याम नागपुरे,प्रमोद गौतम तसेच क्षेत्रातंर्गत येणाèया गावातील शेतकरी उपस्थित होते.