राष्ट्रीय गोवर व रुबेला लसीकरण मोहीमेचा जिल्हाधिकार्यांच्या हस्ते शुभारंभ

0
16

गोंदिया,दि.27ः- राष्ट्रीय गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन  ९ महिने ते १५ वर्षाच्या मुला मुलींना गोवर रुबेलाची लस पाजून तालुक्यातील कारंजा येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष जि.प.अध्यक्ष सीमा मडावी होत्या.उद्घघाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी तर विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते.यावेळी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, जि प कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने, समाज कल्याण सभापती, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. पौनीकर, सरपंच धनवंता उपराडे, उपसरपंच महेन्द्र शहारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मीताराम हरडे, शाळा  व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय बनोठे, मुख्याध्यापिका छायाताई कोसरकर, ग्रामपंचायत पदाधिकारी,शा.व्य.स.चे पदाधिकारी, तंटामुक्त समिती व गावकरी मंडळी व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. टी.जैतवार यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ निमगडे यांनी केले. तर आभार डॉ.चौरागडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी  केंद्रप्रमुख एन.बी.कटरे,मुख्याध्यापिका छायाताई कोसरकर,शिक्षक डी.आय.खोब्रागडे,एम.एम.चौरे,जी.बी.सोनवाने,नरेश बडवाईक,के.जे.बिसेन,महेन्द्र कुरंजेकर,वर्षा कोसरकर,चौरसीया, निनावे व वनिता भिमटे तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी, गावकरी मंडळी व विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न केले.