गोवर रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत प्रत्येक बालकाचे लसीकरण करा – श्रीमती निशा सावरकर

0
14

नागपूर, दि. 28 : गोवर आणि रुबेला यापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून 9 ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना एमआर लसीकरण करण्यासाठी प्रत्येक शाळेत लसीकरण मोहीम राबवताना यापूर्वी लस देण्यात आली असली तरी पुन्हा ही लस द्यावयाची असल्यामुळे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर यांनी केले आहे.
जिल्हा स्तरीय गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मौदा तालुक्यातील चिरवा या गावापासून झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा शल्य चिकित्सत डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.‍ मिलिंद गणवीर, पंचायत समितीचे सभापती राजेश ठवकर, चांगोजी तिजारे, सरपंच श्रीमती सुशिलाताई तिजारे, नरेंद्र वानखेडे, डॉ. सुधीर, दिलीप आखरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रव्यापी अभियानाद्वारे शाळा आणि बाह्य संपर्क सत्राच्या माध्यमातून गोवर आणि रुबेलापासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत 9 ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना एमआर लस देणे आवश्यक आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हास्तरावर विशेष अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये तसेच शाळा बाह्य मुलांना ही लस देवून शंभर टक्के लसीकरणाचे आव्हान स्वीकारण्यात आले आहे. फेटरी येथे 327 विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लस फेटरी येथील आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले विद्यालय येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वार यांच्या हस्ते झाला. यावेळी 327 विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले.
सावित्रीबाई फुले विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आरोग्य उपसंचाल डॉ. संजय जायस्वाल यांनी केला. यावेळी दीप प्रज्वलन करुन शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी डॉ. अश्विन इनामदार, सरपंच श्रीमती धनश्रीताई ढोमणे, सुनील जामगडे सौ. शुभांगी हौस, सुमित नितनवरे, प्रभाकर उईके, अजय वाटकर, मुकेश ढोमणे आदी लोकप्रतिनिधी तसेच डॉ. दीपा कुळकर्णी, डॉ. सोनाली बाके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेंद्र चंदनखेडे यांनी केले तर संचलन बी. के. सहारे यांनी केले. आभार मीना भड यांनी मानले.