धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद््घाटन

0
11

गोंदिया,दि.28ः- स्थानीय धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या स्वर्णजयंतीच्या महोत्सवाच्या पर्वावर २६ व २७ नोव्हेंबर रोजी ‘महिला सशक्तीकरण व नेतृत्व’ या विषयावर आंतरराष्ट्रीय संमेलन पार पडले. संमेलनाच्या उद््घाटन समारोहप्रसंगी गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, संस्था सचिव राजेंद्र जैन, संचालक निखील जैन, गोंदिया शिक्षण संस्था कार्यकारी सदस्य दीपम पटेल व प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक हरीश बैजल, एस.एन.डी.टी. मुंबई विद्यापीठचे कुलपति डॉ. शशिकला वंजारी, बिलासपुर विद्यापीठ कुलपति जी.डी. शर्मा, वध्रेचे एम.जी.आय.आर.आय. संचालक डॉ. आर.के. गुप्ता तसेच विदेशातून आलेले मुख्य वक्ते ऑस्ट्रेलियाचे डॉ. अजिता नायडू सुगनानम, ऑस्ट्रेलियाचे डॉ. डेविड फ्लड, ऑस्ट्रेलियाचे सुली जेम्स ल्युपके, युएसएचे आयन लेबरान ग्रीन, सिथीसॅंग सेंगॉन, देबोरा मॅकन, कॅट एलिजाबेथ मॅकेम्बले, महाविद्यालयाचे प्राचार्य व संमेलन संयोजक डॉ. अंजन नायडू, आयोजन सचिव डॉ. शीतल बॅनर्जी आदी उपस्थित होते.
प्राचार्य व संमेलन संयोजक अंजन नायडू यांनी स्वागतपर पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांनी समारोहाची प्रस्तावना मांडली. यावेळी त्यांनी धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाला गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिक्षणात अग्रसर महाविद्यालय म्हणून संबोधित केले तसेच मागील ५0 वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
उद््घाटन समारोहाचे शुभारंभ करताना संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी ‘सार’ पुस्तिकेचे विमोचन केले. यानंतर मुख्य वक्ता डॉ. अजिता नायडू यांनी महिलांच्या वेगवेगळय़ा क्षेत्रावर प्रकार टाकतांना भारत तसेच इतर देशातील महिलांची सध्या काय स्थिती आहे यावर अभ्यासपूर्ण मार्मिक विवेचन केले. यावेळी पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांनी महिलांच्या सबलीकरणाकरिता कोणते प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच नेतृत्वक्षमता प्रबल करण्याचा दृष्टिकोणाने कोणती पावले उचलली गेली पाहिजे यावर भाष्य केले व महिलांनी पर्यायी वाहतुकीचे साधन म्हणून सायकल अंगीकरणा संबंधी आवाहन केले. कुलपति डॉ. शशिकला वंजारी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की आजच्या महिलांनी व तरुणांनी संकारात्मक दृष्टिकोण बाळगून काळ व परिस्थितीनुसार बदल करून प्रत्येक क्षेत्रात संचार केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी कुलपति डॉ. शशिकला वंजारी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की आजच्या महिलांनी व तरूणींनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून काळ व परिस्थिती याुनसार बदल करून प्रत्येक क्षेत्रात संचार केला पाहिजे असे मत व्यक्त केले. उद््घाटन समारोहाच्या मध्यंतरी टी.ए.एफ.ई.चे संचालक जॉन बेहन यांनी व्हिडिओ चित्र फित द्वारे संदेश दिला की भारतातील स्त्री शक्तीने उर्जावान बनून विविध क्षेत्रात गतीने संचार करून जागतिक पातळीवर आपला लौकिक कसा वाढेल या दृष्टीने अग्रसर होण्याची आवश्यकता आहे आणि आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाने भर पडेल अशी आशा बाळगली. यावेळी समारोहाच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी महिलांना संबोधित करीत कुटुंबापासून ते सर्व क्षेत्रात वावरतांना स्त्रीची भूमिका ही महत्वपूर्ण असते ती प्रत्येक गोष्टीला चालना देण्याचे काम करते. अनेक महत्वपूर्ण निर्णयही स्त्रीयांच्या प्रेरणेने व सहकार्याने घेतले जातात. त्यामुळे स्त्री शक्तीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. स्त्री शक्तीला योग्य चालना मिळाली आणि सर्मथपणे वाटचाल झाली तर अनेक क्षेत्रांमध्ये मौलिक क्रांती होऊ शकेल असे विचार व्यक्त केले. यावर उपस्थित मान्यवर पत्रकारांचे संस्था अध्यक्षा वर्षा पटेल व राजेंद्र जैन यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच आयोजक प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांचे हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांच्या गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राणी खान, विद्यार्थिनी दृष्टी सिंग, अनुश्री पच्चीकर व तसनिम कुरेशी यांनी केले. तर आभार डॉ. शीतल बॅनर्जी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.