२७ व २८ डिसेंबरला गोंदिया येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन

0
12

गोंदिया,दि.24 : राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २७ व २८ डिसेंबर २०१८ रोजी गोंदिया येथील बजाज सभागृह, श्री शारदा वाचनालय येथे ग्रंथोत्सव-२०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन व विक्री, परिसंवाद, कवी संमेलन व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवानिमीत्त २७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता जयस्तंभ चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल कचवे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे उपस्थित राहणार आहेत. ही ग्रंथदिंडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा-नेहरु चौक-गोरेलाल चौक-गांधी प्रतिमा ते शारदा वाचनालय येथे पोहचेल.
सकाळी ११ वाजता पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते बजाज सभागृह, श्री शारदा वाचनालय गोंदिया येथे ग्रंथोत्सवाचे उदघाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे हया राहतील. यावेळी खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, मधुकर कुकडे, अशोक नेते, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, अनिल सोले, ना.गो.गाणार, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरिष बैजल, ग्रंथालय संचालक सुभाष राठोड, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, विभागीय ग्रंथपाल विभा डांगे, सहायक ग्रंथालय संचालक मिनाश्री कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, मुख्याधिकारी चंदन पाटील, ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष शिवकुमार शर्मा, कवी कथाकार व चित्रकार प्रमोद अणेराव, शारदा वाचनालय ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष गोविंद बजाज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुपारी २ ते ३ दरम्यान ‘समृध्द जगण्यासाठी वाचनङ्क या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक लखनसिंह कटरे राहतील तर प्रमुख वक्ते म्हणून एन.एम.डी.कॉलेजचे ग्रंथपाल डॉ.सुनिल जाधव, एस.एस.गर्ल्स महाविद्यालयाच्या प्रा.कविता राजाभोज, गोंदिया दर्शनचे संपादक जयंत शुक्ला उपस्थित राहणार आहेत.दुपारी ३ ते ४ दरम्यान ‘पु.ल.देशपांडे-महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्वङ्क या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये एन.एम.डी.कॉलेजचे प्रा.बबन मेश्राम, देवरी येथील एम.बी.पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ.वर्षा गंगणे सहभागी होतील.
दुपारी ४.३० ते ६.३० दरम्यान कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सुत्रसंचालन शिवकुमार शर्मा व सुरेश बंजारा हे करतील. यामध्ये युवराज गंगाराम, साहिद अन्सारी शफक, अशोक पारधी, पवन पाथोडे व माणिक गेडाम सहभागी होतील.
२८ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमीत्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी-एक परिवर्तनीय व्यक्तीमत्वङ्क या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य ग्रंस्थालय संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ.गजानन कोठेवार तर प्रमुख वक्ते म्हणून सेलू येथील यशवंत महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र मुंढे उपस्थित राहणार आहेत.दुपारी ३ ते ४ दरम्यान ‘स्पर्धा परीक्षा-एक आव्हानङ्क या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, आमगाव उपविभाग पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, सहकारी संस्थेचे सहायक निबंधक नानासाहेब कदम, ब्लॅक ब्रिटीश कॅरियर अकॅडमीचे संचालक दिपक बहेकार सहभागी होतील.
दुपारी ४ ते ६ दरम्यान डॉ.मिर्झा रफी अहमद बेग यांचा ‘मिर्झा एक्सप्रेसङ्क हा हास्यविनोद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व उपस्थिती प्रमाणपत्र वाटप तसेच ग्रंथोत्सव समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनी/मोर येथील एस.एस.जे. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.दिलीप काकडे असतील. विशेष अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, शारदा वाचनालय कार्य समिती अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल उपस्थित राहणार आहेत.
२७ व २८ डिसेंबर रोजी आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री करण्यात येणार आहे. यावेळी शासकीय ग्रंथागार व मुद्रणालय नागपूर यांचे तसेच विविध प्रकाशनाचे स्टॉल उपलब्ध राहणार आहे. तरी या ग्रंथोत्सव कार्यक्रमाला जिल्ह्यातील साहित्यिक, लेखक, वाचक, विद्यार्थी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी केले आहे.