बापूसाहेब हे शिक्षणाचे खरे शैक्षणिक भाग्यवंत-प्रा.खेडीकर

0
13
लाखणी,दि२६पूर्व विदर्भ आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगोत्री आणण्याचे काम शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखणीकर यांनी केले. त्यांनी प्रतिकूल काळात शिक्षणाचे कार्य सुरू केले त्यांनी शाळा सुरू केली त्यामुळे माझ्यासारखे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहे. बापूसाहेबांनी हजारो लोकांना रोजगार दिले. आयुष्यभर अनेक समाजपयोगी कार्य केले, असे मत प्रा विकास खेडीकर यांनी १७ व्या पुण्यसमरणा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विविध कार्यक्रम घेऊन बापूसाहेबांच्या आठवणींनी उजाळा देण्यात आला. निबंध स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यावेळी घेण्यात आले आणि विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक किशोर आळे, विजया घनमारे, शिवलाल निखाडे, गायत्री भुसारी, प्रशांत ढोमने, गोवर्धन गिर्हेपुंजे, अक्षय मासुरकर आदी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.