भटक्या जमातीत समावेशासाठीरा कुंभार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
8

गोंदिया,दि.26ः- विमुक्त भटक्या जमातीत कुंभार समाजाला समावश करण्यात यावे या मागणीसह महाराष्ट कुंभार समाज महासंघाच्या गोंदिया शाखेच्यावतीने आज 26 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष सुरेश चितवे यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात कुंभार समाजाला एनटी प्रर्वगात समाविष्ट करावे,उदरनिर्वाहासाठी भटकंतीचे आयुष्य जगणा-या कुंभार समाजाचा विमुक्त भटक्या जमातीत समाविष्ट करावा, कंुभार समाजातील विट,मटकी व मूर्ती व्यवसायाकरिता असलेल्या कुंभार खाणी समाजाला त्वरित बहाल कराव्यात,कुंभार
समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधीत्व द्यावा,संतशिरोमणी गोरोबा काका यांचे जन्मगांव तेर जिल्हा उस्मानाबाद येथे विस्तृत विकास आराखडा तयार करून तेर चा सर्वागीण विकास करण्यास यावा व तेर तिर्थक्षेत्रास अ दर्जा देण्यात यावा,मातीवरील राॅयल्टी माफी बाबतचे व समाजातील विट व्यावसायिकांना आवश्यक परवानाबाबतचे स्पष्ट निर्देश सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात यावे ,कुंभार समाजातील 50 वर्षावरील निवृत्त व्यवसायिकांला एमआयडीसी मध्ये अग्रक्रमाने जागा देण्यात यावी,प्लाॅस्टर
आॅफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे आणि विक्रीवर बंदी करण्यात यावी व गोंदिया जिल्हयातील विट भट्या कंुभारांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काम करून द्यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुरेश चितवे, गुड्डु चक्रवर्ती, ईश्वर चक्रवती,काशीनाथ कपाट, सुभाष वाघाडे, हेमंत चक्रवर्ती, रवि प्रजापती, सुरेश प्रजापती,कंुवरलाल तेलासु यांच्या मोठया संख्येने कुंभार समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.