राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

0
13

गोंदिया,दि.28 : भारतीय जल संसाधन मंत्रालयामार्फत राष्ट्रीय जल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. जल संसाधन क्षेत्रात सर्वोत्तम कामगीरी करणाऱ्या विविध संस्थांना पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय जल पुरस्काराकरीता सर्वोत्तम राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, सर्वोत्तम महानगर पालिका, नगर पालिकेचे इतर विभाग, उत्कृष्ट शाळा, टीव्ही शो आणि उत्कृष्ट वर्तमानपत्र इत्यादींना समाविष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय भूजल मंडळांनी पुरस्कारासाठी अर्ज जमा करण्याकरीता नोडल एजन्सी नियुक्त केली आहे. अधिक माहितीसाठी सांकेतिक स्थळ www.mowr.gov.in किंवा www.cgwb.gov.in यावर भेट देता येईल. राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१८ आहे. असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनिल कोरडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.