ओबीसी व मराठा समाजाला संख्येच्या प्रमाणात गडचिरोलीत आरक्षण द्या

0
11

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाची मागणी

गडचिरोली,दि.29 :-महाराष्ट्र राज्यमध्ये ओबीसी समाजाला सर्वात कमी आरक्षण गडचिरोली जिल्ह्यात आहे.बहुसंख्य समाज असूनही संख्येच्या प्रमाणात आरक्षण नाही.आरक्षण नसल्याने मुलांची शैक्षणिक, आर्थिक बाजू कमकवूत होत चालली आहे.यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.त्यातच महाराष्ट्र शासनाने १९ डिसेंबंरच्या शासन निर्णयात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले.जिल्ह्यात 5 टक्केही लोकसंख्या नसलेल्या समाजाला 16 टक्के आरक्षण कसे काय देण्यात आले अशी विचारणा करीत गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी व मराठ्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन देऊन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ५० टक्केच्यावर ओबीसी समाज असतांनाही संख्येच्या प्रमाणात आरक्षण नाही.देशात गुरांची गणना केली जाते व संख्येच्या प्रमाणात त्याच्या उन्नतीकरिता योजना आखल्या जातात.परंतु बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाची गणना नसल्याने ओबीसी समाजाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही.जिल्ह्यातील ओबीसी समाजाची २०११ ची गणना जाहीर करून आरक्षण देण्यात यावे.मराठा आरक्षणाला विरोध नसून परंतु त्यांची गणना करून गडचिरोली जिल्ह्यात संख्येच्या प्रमानात आरक्षण देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांच्या मार्फत मुख्यमंत्री ,राज्यपाल तसेच सामाजिक न्याय मंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे , राहुल भांडेकर , लोकमान्य बरडे , चक्रधर पारधी , सूरज डोईजड , स्वप्नील घोसे , पवन भोयर , आकाश भोयर , अक्षय शेबे , नरेश महाडोळे , भाष्कर पेठकर , परमानंद पूंनमवार , कपिल नरुले ,वैभव जुवारे , माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव वासेकर , जितेंद्र टिकले व पुष्पाताई करकाडे उपस्थित होते.