२६ वे झाडीबोली साहित्य संमेलनांला ग्रथंदिंडीने सुरवात

0
13
गोंदिया,दि.30ः-  झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीच्यावतीने २६ वे झाडीबोली साहित्य संमेलनाती सुरवात आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे  शनिवार २९ डिसेंबरला सकाळी ग्रंथदिंडीने करण्यात आली.याग्रंथदिंडीमध्ये(पोहा) मुरलीधर फुंडे,विनायक करंडे व त्यांचे सहकारी भजन मंडळ,जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा व स्व.राधादेवी शर्मा हायस्कुलचे विद्यार्थीसह नागरिक सहभागी झाले होते.ग्रंथदिंडीमध्ये या समेलनाचे समेलनाध्यक्ष मिलिंद रगांरी,डाॅ.हरिश्चद्रं बोरकर,लखनसिह कटरे,देवेंद्र चौधरी,डाॅ.अरविंद कटरे,बापुराव टोंगे यांच्यासह झाडीपट्टीतील लेखक व कवी सहभागी झाले होते.
समेलमनाचे उद्घाटन प्रा.मिलिंद रंगारी यांनी केले.अध्यक्षस्थानी सुनील कुहिकर होते. मंचावर अंजनाबाई खुने, चंद्रमोहन गुप्ता, डा.हरिशचंद्र बोरकर, देवेंद्र गावंडे, डा.चंद्रमोहन गुप्ता, माधव चंदनकर, विजय बहेकार, भोजराज ब्राह्मण·र, महेश टेंभरे, बंडोपंत बोढेकर, शिवशंकर बावनकुडे, हिरामन लंजे, राजन जायस्वाल, दिवाकर  डोमा कापगते, बापुराव टोंगे, नरेश देशमुख, देवेंद्र रहांगडाले आदी उपस्थित होते.पूर्वसम्मेलनाध्यक्ष बंडोपंत बोढ़ेकर यांनी सम्मेलनाध्यक्ष मिलिंद रंगारी यांना कार्यभार सोपविला.यावेळी दत्तात्रय आंधले  डा.मधुकर नंदनवार ,ना.रा.शेंडे आदींचा सत्कार करण्यात आला.सुकचंद वाघमारे, डोमा कापगते, बंडोपंत बोढेकर, सुभाष धकाते, नरेंद्र नारनवरे, किरण मोरे, दिनेश अंबादे, ज्ञानेश्वर टेंभरे, देवेंद्र चौधरी, अश्विन खांडेकर, इंद्रकला बोपचे, महेंद्र सोनवाने आदि साहित्यिकांच्या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.संचालन अनिल शहारे, पवन पाथोडे तथा आभार लखनसिंह कटरे यांनी मानले.
आजचे कार्यक्रम
३० डिसेबर रविवारला सकाळी ९वाजता विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजन जायस्वाल राहणार आहेत.ना.गो.थुटे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.सूत्रसंचालन : लखनसिंह कटरे व आभार आशिष लिलाधर कटरे हे करणार आहेत.सातवा सत्रामध्ये आमची झाडीबोलीची पुस्तक या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे राहणार आहेत तर बाबूराव टोंगे,डोमा कापगते,दिवाकर मोरस्कर,अंजनाबाई खुणे,विष्णू भेंडारकर,ना.गो.थुटे हे सहभागी होणार आहेत.संचालन लोकेश नागरीकर तर आभार रितेश शहारे हे करतील.आठवा सत्रात सकाळी ११:३० ते ०१:३० वाजता आमी नाचतून,ते हासतेत या विषयावर चर्चा होणार आहे.अध्यक्षस्थानी हिरामण लांजे राहणार असून
पांडुरंग भेलावे,संजय निंबेकर,ग.रा.वडपल्लीवार,पुना अवरासे,सुबोध कान्हेकर,डॉ.चेतन राणे हे सहभागी होणार आहेत.या सत्राचे सूत्रसंचालन  देवेंद्र रहांगडाले तर आभार राजेश कटरे करतील.९ व्या सत्रात भाषिक कविसमेलन घेण्यात येणार असून लखनसिंह कटरे भूमिका मांडणार आहेत.सूत्रसंचालन डॉ.संतोष मुज़मदार (ईलाहाबाद निज़ामत) हे करतील तर साजिद खैरो, वाराशिवनी,दिनकरराव दिनकर वाराशिवनी,साहबलाल सरल, बालाघाट, भाऊराव महंत बालाघाट,संजय अश्क बालाघाट,गजेंद्र रामटेके डोंगरगढ,संतोष बरमैया रामटेक,भूपेश भ्रमर लांजी,शशि तिवारी,मनोज बोरकर गोंदिया,असीम आमगावी आमगांव,चैतन्य माथुरकर, माणिक गेडाम,युवराज गंगाराम, लक्ष्मीकांत कटरे,रूपचंद जुमहारे गोंदिया,डी.एस.टेंभुर्णे आमगांव,कु.सरिता सरोज गोंदिया व बसंत मोहारे आमगांव सहभागी होणार आहेत. सायकांळी ०३:३० ते ०५:०० वाजता समेलनांचा समारोप समेलनाध्यक्ष मिqलद रंगारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.या समारोपाला जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले विशेष अतिथी राहणार आहेत.तसेच प्राचार्य श्रीराम भुस्कुटे,राजकुमार हिवारे,उषाकिरण आत्राम,प्राचार्य व्ही.डी.मेश्राम,प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे,झामसिंग येरणे उपस्थित राहणार आहेत.