शासकीय योजनांचा लाभ कामगारांना मिळालाच पाहिजे -आ. रहांगडाले

0
17

गोरेगाव,दि.02 : कामगारांना कामाच्या दामासह ईतरही सोई सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने नव्याने कामगार योजनेत वृध्दी करून आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्थान उंचावण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ कामगारांना मिळालाच पाहिजे. असे तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचार्‍यांना सूचना व निर्देश देताना आमदार विजय रहांगडाले यांनी सांगितले.
स्थानिक तहसील कार्यालयात दि. २९ डिसेंबरला आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.या आढावा बैठकीत तहसीलदार कल्याण डहाट,मुख्याधिकारी हर्षला राणे,खंडविकास अधिकारी प्रतिनिधी,महसुल विभागाचे कर्मचारी,तसेच माजी उपसभापती बबलू बिसेन, प.स.सदस्य पुष्पराज जनबंधू, माजी सभापती चित्ररेखा चौधरी, भाजप महामंत्री संजय बारेवार, डॉ. लक्ष्मण भगत प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आढावा बैठकीत कामगारांना लाभान्वित करणारे विषय हाताळताना आमदार विजय रहांगडाले यांनी तालुक्यात मग्रारोहयो,पंतप्रधान आवास,शबरी,रमाईआवास योजनांचा आढावा घेतला व शासनाच्या ग्रामीण व शहरी अन्न सुरक्षा योजनेत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पूर्नसर्वेक्षण करून लाभ देण्यासाठी सुचना व निर्देश दिले.
यावेळी मग्रारोहयो व ईतर शासकीय कामावर काम करित असलेल्या मजूरांचाही त्यांनी आढावा घेतला. या सर्व मजूरांना शासनाच्या योजनेनुसार लाभ देण्यासाठी तहसीलदार, खंडविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी काटेकोर पणे लक्ष देऊन वेळीच कार्यवाही करावी. व कामगारांना त्याच्या हक्काचे लाभ द्यावे यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली.