वाशिममध्ये अवैध सावकारांवर धाडी अवैध दस्ताऐवज जप्त

0
14

वाशिम, दि.10 : वाशिम शहरात अवैध सावकारी करणारे रामभाऊ सांगळे व बंडू तुपसांडे यांच्या घरी व प्रतिष्ठानावर ९ जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक आर.एन. कटके यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या धाडीमध्ये १०५ च्या वर अवैध सावकारीचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले. यामध्ये कोरे धनादेश, खरेदीचे स्टॅम्प, अवैध सावकारीच्या नोंदी असलेल्या वहया अशा दस्ताऐवजाचा समावेश आहे. त्याची एकूण अंदाजे किंमत १.५ कोटीच्या वर असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले.

            जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर झालेल्या बैठकीमध्ये जिल्हयातील अवैध सावकारांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या असता शहरातील दोन अवैध सावकारांवर एकूण तीन पथकांनी धाडी घातल्या या पथकामध्ये सहकार विभागाचे एकूण १८ अधिकारी व कर्मचारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत उपस्थित होते. याकामी पोलीस विभागातील १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य केले. तसेच सहायक निबंधक श्रीकांत खाडे यांच्या नेतृत्वात कारंजा सहायक निबंधक परेश गुल्हाने, रिसोडचे सहायक निबंधक एम.बी. बनसोडे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिक्षक जी.बी. राठोड, सहकार अधिकारी ए.एम. सार्वे, बी.एन. गोदमले, एस.पी. फुके, एस.व्ही. राठोड, पी.आर. वाडेकर, के.पी. भुस्कडे, एन.डी. धार्मिक, आर.एन. गरकल, के.जी. चव्हाण, श्रीमती एम.के.जाधव, सी.डी. राऊत, टी.एस. थेर, बी.बी. मोरे, एस.बी. रोडगे, एस.जी. गादेकर, एस.पी. सांगळे, तसेच पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. जायभाये, श्रीमती परांडे, श्री. डाखोरे व पोलीस कर्मचाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश होता.

            या धाडसत्रामध्ये जप्त केलेल्या दस्ताऐवजाची तपासणी करुन रक्कमेच्या निश्चितीबाबत महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था,वाशिम यांचेमार्फत तपास सुरु आहे. त्यानंतर संबंधित अवैध सावकाराच्या विरुध्द पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, आर.एन. कटके यांनी सांगीतले.