हत्तीरोग निर्मूलन मोहीम यशस्वीपणे राबवा– जिल्हाधिकारी

0
10

20 जानेवारीपासून मोहिमेला प्रारंभ
नागपूर, दि.12 : शहरात हत्तीरोगाच्या‍ समूळ उच्चाटनासाठी हत्तीरोग निर्मूलन मोहीम यशस्वीरित्या राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संबंधित विभागाला दिले. छत्रपती सभागृह येथे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद गणवीर यावेळी उपस्थित होते.
नागपूर शहरात आयवरमेक्टीन, डी. ई.सी. आणि अल्बेंडॉझॉल (आयडीए) ट्रीपल ड्रग्ज थेरेपीद्वारे राबविण्यात येणार असून, कृती आराखडा महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने तयार केला आहे. शहरातील 28 लाख 99 हजार 890 लोकसंख्येला 9 ते 15दिवसांत गोळ्या वितरणासाठी 4 हजार कर्मचारी आवश्यक आहेत. हत्तीरोग दुरीकरणांतर्गंत जनतेतील हत्तीरोगाचा प्रसार करणाऱ्या जंतूंचा जंतूभार कमी करण्यासाठी ट्रिपल ड्रग थेरेपी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे याची बाह्य लक्षणेयुक्तांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.