२० रास्तभाव दुकानांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध

0
15

वाशिमदि. १७ :  जिल्ह्यातील २० गावांमध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने मंजूर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याचे अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयं सहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राथम्यानुसार रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार असून संबंधितांनी २१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संबंधित तहसील कार्यालयामार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी कळविले आहे.

वाशिम तालुक्यातील वाशिम शहर वार्ड क्र. ४, वाशिम शहर वार्ड क्र. ९, कुंभारखेडा, धारकाटा, मालेगाव तालुक्यातील कुरळा, झोडगा खु., वरदरी खु., पांगरखेडा, रिसोड तालुक्यातील तपोवन, जायखेडा, पाचांबा, मंगरूळपीर तालुक्यातील चाधई, एकांबा, बालदेव, मोतसावंगा, शेलगाव, स्वाशिन, कारंजा तालुक्यातील पिंपळगाव खु., मानोरा तालुक्यातील शिंगडोह व जामदरा घोटी या २० रास्तभाव धान्य दुकानांचे परवाने वितरीत करण्यात येणार आहेत, असे श्री. वानखेडे यांनी कळविले आहे.