शेतकरी हितासाठी एकजुटीने संघर्षाची गरज-अमिताभ पावडे

0
11
गोरेगाव,दि.२२: संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियान अंतर्गत तालुक्यातील चांगोटोला येथे २१ जानेवारीला शेतकरी मंथन परिषद व संगीतमय प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडले.यावेळी मार्गदर्शन करतांना कृषी अभ्यासक अमिताभ पावडे यांनी शेतकèयांचे शोषण करण्याचे धोरण सरकार राबवित असल्यामुळेच शेतकèयांच्या मुलांना कृषीअर्थव्यवस्थेसारखे अभ्यासक्रम प्राथमिक शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंत कुठेच शिकविले जात नाही.उलट धर्माच्या नावावर शोषण करुन त्यांना वेदउपनिषदही शिकू दिले नाही.आणि आजही धर्मशास्त्र शिकण्याची व्यवस्था धर्मात नाही.तर शेतकèयांच्या सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर आपसातील धर्मभेद,जातीभेद विसरून शेतकèयांसाठी स्वतंत्र्य कृषी अर्थसंकल्प,पेन्शन योजना,फॅक्टरीअ‍ॅक्ट व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असल्याचे विचार त्यांनी व्यक्ते केले. आयोजन करण्यात आले आहे.
 या परिषदेचे उद्घाटन जि.प. सदस्य ज्योती वालदे यांच्या हस्ते, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिलाध्यक्ष बबलू कटरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. अमिताभ पावडे,स्वागताध्यक्ष उपसरपंच राजू येडे,जिल्हा बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे,सावन कटरे,ओबीसी सेंवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ.संजिव रहांगडाले, पं.स.सदस्य ललीता बहेकाार, सरपंच मिना काठेवार, सरपंच सरिता चौधरी, सरपंच कुसन भगत, अल्का पाथोडे, रत्नकला भेंडारकर, प्रल्लाताई दिहारी, केंद्रप्रमुख आर.आर.अगडे, ओबीसी सेवा संघ अध्यक्ष डॉ. संजीव रहांगडाले, ओबीसी संघर्ष कृती समिती अध्यक्ष उमेंद्र कटरे, दिलीप चव्हाण, उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजता सप्तखंजीरी वादक तुषार सूर्यवंशी यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जियालाल खंडाळकर यांच्या हस्ते ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा.बी.एम. करमकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.आयोजनासाठी चौकलाल येडे,गजानन बिजेवार यांच्यासह ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवासंघ,गुरुदेव सेवा मंडळ व बचत गटाच्या सदस्याने सहकार्य केले.