निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायययोजना करा-दीपक कुमार मीना

0
10

वाशिमदि. २५ : आगामी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था उत्तम राखतांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात २५ जानेवारी रोजी निवडणूकीची पूर्व तयारी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतांना श्री. मीना बोलत होते. यावेळी प्रभारी पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडेउपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. मीना म्हणालेनिवडणुकीच्या काळात गुन्हा करण्याचे कुणीही धाडस करणार नाही, यादृष्टीने पोलीसांनी कडक कारवाई करावी. निवडणुकीदरम्यान हिंसाचार घडवून आणणाऱ्या जबाबदार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करावी. जिल्ह्यातील संवेदनशिल आणि अतिसंवेदनशील मतदार केंद्र तसेच कमी मतदार झालेल्या मतदान केंद्रावर व महिला मतदारांनी कमी मतदान केलेल्या केंद्रावर पोलीस विभागाने विशेष लक्ष देण्याच्या सूचना श्री. मीना यांनी यावेळी दिल्या.

ज्या मतदान केंद्रावर मोबाईलची रेंज नसेल अशा ४२ केंद्रावर संपर्कासाठी बिनतारी संदेश वहनासाठी उपकरणे सज्ज ठेवावी असे सांगून श्री. मीना म्हणाले कीअशा केंद्रावर कुठलीही अप्रिय घटना घडताच २० मिनिटाच्या आत पोलीस घटनास्थळी पोहचतील याची खबरदारी घ्यावी. निवडणूक विषयक ज्या जबाबदाऱ्या निवडणूक आयोगाने ज्या यंत्रणांवर टाकलेल्या आहेत त्याची माहिती यंत्रणांना असली पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्राला भेट देवून सुविधा आणि सुरक्षेच्या बाबतीत असलेल्या उणीवांची माहिती घ्यावी, असे निर्देश दिले.

पोलीस विभागाला निवडणूकीच्या काळात आवश्यक तेवढी वाहने निवडणूक विभागाकडून उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगून श्री. मीना म्हणालेगुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे तडीपारीचे प्रस्ताव मागविले आहे. ज्यांच्यावर गुन्हेगारीचे गुन्हे आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे. आदर्श आचारसंहितेचे पालन निवडणूकीच्या काळात प्रत्येकाकडून केले जाईल याबाबत काळजी घ्यावी. मतदान केंद्रनिहाय संवाद समन्वय आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २०७५ पोलीस जिल्ह्यातील १०४३ मतदान केंद्रावर तैनात राहणार असून मदतीला राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्याही तैनात राहणार आहे. निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभाग तत्पर राहणार असल्याची माहिती श्री. डोईफोडे यांनी दिली. राजकीय पक्षांना विविध मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी देण्याची व्यवस्था एक खिडकी योजनेतून करणार असल्याचे श्री. हिंगे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत घडलेल्या गुन्हयाची माहिती व त्याची सद्यस्थिती पोलीस स्टेशननिहाय संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून जाणून घेतली. सभेला उपविभागीय पोलीस अधिकारीसर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच स्थानिक गुन्हे शाखाजिल्हा विशेष शाखेचे अधिकारी उपस्थित होते.