अवकाळी पावसाचा सिरोंचा तालुक्यातील शेतक-यांना फटका

0
14

सिरोंचा,दि.28 :-तब्बल 48 तासापासुन सतत मुसळधार पावसाने गडचिरोली जिल्हयात थैमाण घातले असुन या अवकाळी पावसाचा सिरोंचा तालुक्यातील नगदी पिके घेणा-या शेतक-यांना फटका बसल्याने शेतकरी हवाल दिल झालेला आहे.मिरची , कापूस , मुंग ,ज्वारी , व मक्का , पिक घेणारे शेतकरी मात्र अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतापर्यत कोणताच शासकीय कर्मचारी न पोहचल्याने शासणाप्रती शेतक-यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.

महाराष्ट्र आणि तेंलगाणाच्या सीमेवरील गड़चिरोली जिल्हयातील शेवटच्या तालुका धनदाट जंगल , नक्षलवादाचा प्रभाव आणि अतिदुर्गम ही ह्या तालुक्याची वैशिष्टये अगदी हाकेच्या अंतरावर तेंलगाणा राज्याची सीमा , बहुभाषिक तेलगू भाषेचा तालुका तब्बल 48 तासापासुन सिरोंचा तालुक्यात मुसळदार पावसाचे हजेरी लावल्याने मिरची , कापुस , मुंग , मक्का , ज्वारी आदि पिके घेणारी शेतक-यांना लाखोच्या नुकसान झाला.असुन तालुक्यातील सिरोंचा नार यणपुर , मेड़ाराम , नंदीगाव , मदधीकुंटा , रेंगुठा , परिसरातील कोटापल्ली , दर्शेवाड़ा , परसेवाड़ा , येला , कोत्तुर , भागातील शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

असुन शासनाचे कोणतेच शासकिय कर्मचारी घटणास्थळी न पोहचल्याने शासणाप्रति तिव्र नाराजी व्यक्त केलेली आहे .युवक काॅग्रेसचे कार्यकर्ते या शेतक-यांच्या हाल विचारण्याकरिता भरपूर चिकलत युवक काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष कौसर खान याच्या सोबत ,बापू नसकुरी ,नुशेट्टी दुर्गय्या , बोलमपल्ली रिविंद्र, पेद्दोजी महेश , पुराला रवि , चौधरी संपत्ती , कौटला साईकिरण , युवा नेते आकाश परसा , विधानसभा सचिव लक्ष्मण मेकला , माहिला आघाड़ी अध्यक्ष सौ.तिरूमला दासरी , नौशाद शेख , शरीक शेख, चंदु पेड़याला , शंकर गग्गुरी , चंद्रमोहन कोंड़ावार , श्याम रंगुवार , मजीद अली , देवय्या येनगदुला , सैफ शेख , सलामान शेख , रामु बोगोणी , किरण मंड़ावार , नरेंद्र पानेमवार,नुकसान झालेले शेतक-यानमध्ये नसकुरी आशालु बापू , नुरशेट्टी स्वीमी बापु , नुरशेट्टी दुर्गय्या चंद्रय्या , अन्नेला नानय्या , नसकुरी रमेश , इगली पुलय्या , इगली रामुलु , काड़ेकारी स्वामी, आदी शेतक-याचे मिर्ची चे आतोनत प्रामाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते.या मिर्ची उत्पादन घेणा-या शेतक-यांना तात्काळ मदत दयावी अशी मागणी युवक काॅग्रेस सिरोंचाच्या वतीने करण्यात आलेली आहे.