शेतकऱ्याचा मुलगा भारतीय सैन्यात; गावकऱ्यांनी केले सत्कार

0
12
मोहाडी,दि.28: देशाच्या रक्षणार्थ सीमेवर रात्रंदिवस पहारा देऊन नागरिकांची सुरक्षा करणारे सैनिक आपल्या जीवाची पर्वा करीत नाही. ते जागून रक्षण करतात. म्हणूनच आपण आपल्या घरी निवांत झोपतो. देशाच्या रक्षणार्थ वीर मरण पत्करणारे शहीद जवान व त्यांच्या कुटुंबीयांचा आम्हाला अभिमान आहे. हे सैनिक फक्त सीमेवर लढत नाही तर देशात कुठेही आतंकवाद, नक्षलवाद यांचा खात्मा करण्याकरिता व कुठल्याही आपत्तीच्या वेळी जनतेच्या सुरक्षेकरिता तत्पर असतात, आमच्या छोट्याश्या सिहरी गावातील शेतकऱ्याचा मुलगा नितीन पारधी हा भारतीय सैन्यात भरती झाल्याने गावकऱ्यांना गर्व आहे. सैनिक आमची आन-बान-शान आहेत, असे प्रतिपादन सरपंच सुमन बघेले यांनी केले.
गावकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रथमच गावातून सैन्य भरतीत लागल्याने आयोजित सैनिकाचे सत्कार कार्यक्रमत  शनिवारी सायंकाळी ७ वाजता ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सुमन बघेले, कार्यक्रमाचे अध्यक्ष रामप्रसाद बघेले हे होते.गावकरी या वेळी बोलत होते की, शेतकऱ्यांचा मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन सर्वसामान्य सारखे आपले शिक्षण पूर्ण केले, सैनिकांचे वडील भोलाराम पारधी हे शेती व्यवसाय करीत असून भारतीय सैनिकात लागल्याने गावकऱ्यांना अभिमान वाटायला लागला आहे.जे सैनिक आपले सर्वस्व त्याग करून आमची रक्षा करतात, त्यांचे आपण ऋणी आहोत व राहणार. त्यांचे मनापासून आभार मानण्याकरिता आमच्या गावातील प्रथमच सैन्य भरतीत लागल्याने सैनिकांचा सत्कार कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात येत असल्याचे बोलले.
 यावेळी रामप्रसाद बघेले  यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आमचे सैनिक हीच आमची ताकत असल्याचे सांगून आमची प्रेरणा असल्याचे म्हणाले. भारत माता की जय, वंदे मातरण व जय हिंदच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेले होते. सत्कार समारंभ प्रसंगी प्रीतीलाल पारधी अध्यापक, सेवकारम पारधी,भगवान बच्छेरे, पोलीस पाटील कल्पना गौरे, देवदास बघेले, विलास पारधी, भोलाराम पारधी, प्यारेलाल शरणागते, सुखदेव सेलोकर, किशोर शरणागते, छबिलाल बघेले, राजेश सूर्यवंशी, राधेश्याम शरणागते,डॉ गौरकर, महेश पराते, नितीन लिल्हारे, गुलाब शरणागते. व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.सत्कार समारंभ प्रसंगी भारतीय सैनिक नितीन पारधी यांनी गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.