मतदारासह अधिकारी व लोकप्रतिनिधिनी घेतली शपथ

0
34
सालेकसा,दि.30ः- सालेकसा तालुका प्रशासनाच्या वतीने  25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून तालुक्यातील साखरीटोला येथे साजरा करण्यात आला.येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मतदार दिवस कार्यक्रमात आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याव्दारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाहीवर परंपरचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकाचे पवित्र राखु व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश,जात, समाज, भाषा, यांच्या , विचाराच्या प्रभावाखाली न येता किवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पड़ता मतदान करू अशी शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमाताई मड़ावी, आमदार संजय पुराम, महिला व बालकल्याण सभापति लताताई दोनोडे,तहसिलदार सी.आर.भंडारी, जि.प.सदस्या उषा मेंढे, सरपंच संगीताताई कुसराम,रमेश चुटे, माजी सभापती श्रावण राणा, सुनील अग्रवाल, डॉ अजय उमाटे, प्रा.सागर काटेखायें, संतोष बोहरे, देवराम चुटे, संगीता शहारे, संतोष अग्रवाल, विणा गणवीर, प्रदीप अग्रवाल, मंचावर उपस्थित होते.
29 जानेवारी रोजी पथक प्रमुख एम. बी.रघुवंशी मंडळ अधिकारी कावराबांध, तालुका सालेकसा यांच्या नेतृत्वाखाली तलाठी आर.एम. काकड़े आर.एच्. मेश्राम, एम.डी.कोहपरे, एस. डी. बोबडे, आर.एस. उइके, डी.टी. हत्तीमारे,(म.अ.) कु. एम.एन.कळबे, नन्दलाल शहiरे, नितिन चुटे, संगीता चापुडहाके, यांनी मतदार जनजागृती कार्यक्रमात मतदाराकडून प्रत्याक्षिक करून घेतले.दुर्गुटोला येथे 62, सातगांव येथे 64, सलंगटोला येथे 66, कारूटोला येथे 109, साकरीटोला येथे 127, मतदारानी EVM मधे मतदान करून VVPAT मधे आपल्या मताची तपासणी केली.साखरीटोला येथील मतदार जनजागृती कार्यक्रमiप्रसंगी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, प्रदीप अग्रवाल, रवि पडोले, फत्तू बघेले, अंकुश खंडारे, शैलेश दोनोडे, कृपाल बहेकार, आणि मतदार उपस्थित होते,