सामाजिक व आर्थिक प्रगतीत महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण:वर्षा पटेल

0
27

गोंदिया,दि.07ः :: जग आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. अशात महिलांची जबाबदारी वाढली आहे. ज्याप्रकारे कुटुंबाला दिशा देण्याची जबाबदारी महिलांची आहे, त्याचप्रमाणे समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य महिलांनी करावे. आजघडीला मागे न राहता सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाजकार्यात महिलांनी पुढाकार घ्यावा, सामाजाच्या उत्थान आणि आर्थिक प्रगतीसाठी महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल ॲकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले..

नजीकच्या फुलचूर येथे आयोजित महिला मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुलचूरचे सरपंच लक्ष्मी कटरे ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ऊर्मिला नागपुरे, ऊर्मिला रहमतकर, बेबी सिडाम, सुशीला नेवारे, डॉ.प्रीती नागपुरे, आशादेवी मेश्राम, मीना देवगौडे, सुनीता बघेले, हर्षा पाटील, सुरेखा अंबुले, वनिता बिसेन, सुनीता सव्वालाखे, अर्चना अंजनीकर, पुष्पलता कटरे, गौरी लिल्हारे, लिलावती नागपुरे, सुनीता ठाकरे, रोहिणी पटले, कांता भांडारकर, सेवंता गणपत भांडारकर, रानी बैस, कल्पना कुंभरे आदींसह महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. याप्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात महिलांनी उत्स्फूर्तरित्या सहभाग घेतला. दरम्यान महिला हळदी-कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आशिष नागपुरे, देवचंद बिसेन, महेश अंबुले, मुकेश पाटील, बंडू चन्ने, प्रमोद बडवाईक, विजय पटले, सुनील नागपुरे, बंडू कुंभलकर, दुर्गाप्रसाद नागपुरे, संदीप बनकर, नेतराम बावणे, रूपचंद अंबुले, गोपाल अजनीकर, रवी शेंद्रे आदींनी सहकार्य केले..