अवैधरित्या साठवलेल्या १०० ब्रास रेतीचा साठा जप्त

0
29
ट्रक्टरमालकावर ४ लाख ६१ हजार ६०० रुपयाचा दंड
गोंदिया,दि.०७ः-गोंदिया तालुक्यातील रावणवाडी मंडळअंतर्गत महसुल विभागाचे मंडळ अधिकारी डी.एच.पोरचट्टीवार,तिवारी,लिपिक आशिष रामटेके  यांच्या पथकाने ६ फेबुवारीला अवैधरित्या रेतीची वाहतुक करतांना संतोष पुरणलाल पटले य(कोचेवाही)यांच्या ट्रक्टरक्रमांक एमएच ३५,जी.४७५२ व ट्राली क्रमांक एमएच ३५ एफ ३६९७ मध्ये १ ब्रास रेती वाहतुक करतांना पकडण्यात आले.रामदास डोमा नागफासे(बिरसोला)यांचा क्रमांक नसलेला सोनालिका कंपनीचा ट्रक्टरमध्ये १ ब्रास रेती विना रायॅल्टी नेत असताना पकडले. राजकुमार दंदरे बिरसोला यांच्या एमएच ३५ जी.७२२७,ट्राली एमएच ३५ ९१०९ ट्रक्टरमध्ये गिट्टी भरतांना पकडण्यात आले.कन्हारटोला येथील दिपक नागपूरे यांच्या एमएच ३५,जी.८३५३ व ट्राली एमएच ३५ एफ २२१९ मध्ये १ ब्रास रेतीची वाहतुक करतांना पकडण्यात आले.या सर्वांना तहसिलदार राहुल सारंग यांनी याप्रकरणात प्रत्येकी १ लाख १५ हजार ४०० रुपयाचा दंड ठोठावला आहे.
त्याचप्रमाणे वडेगाव(बनाथर)येथील पुनर्वसन परिसरात सुमारे १०० ब्रास रेतीसाठी आढळून आल्याने तो जप्त करुन पोलीस पाटील आशिषqसग चव्हाण यांच्या सुपुर्तनाम्यावर देण्यात आले आहे.त्याचप्रमाणे सदर रेती महसुल अधिकाèयानी दिलेल्या निर्देशानुसार पोचती करण्याचे निर्देश दिले आहे.