हृषीकेश मोडक यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली

0
65
????????????????????????????????????

वाशिम, दि. ०९ :  वाशिमचे नवनियुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी श्री. मीना यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार बळवंत अरखराव, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. राहुल वानखेडे, महसूलच्या तहसीलदार शीतल वाणी, नगरपरिषद मुख्याधिकारी वसंत इंगोले उपस्थित होते.

            श्री. मोडक हे २००८ च्या बॅचचे मणिपूर केडरचे आयएएस अधिकारी आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत त्यांनी मणिपूर राज्यात विविध पदांवर काम केले आहे. तसेच एप्रिल २०१४ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत मणिपूर राज्यातील उखरूल जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. वाशिम येथे नियुक्ती होण्यापूर्वी ते राज्याच्या आदिवासी विकास विभागात नागपूर येथे अपर आयुक्त म्हणून कार्यरत होते. वाशिम जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडून जिल्ह्यातील महत्वाचे विषय, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माहिती संकलनाची सद्यस्थिती, भारतीय जैन संघटनेमार्फत जिल्ह्यात सुरु असलेली जलसंधारणाची कामे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी आदी विषयांची माहिती जाणून घेतली.