सीईओंनी सिहोरातील विविध कामांचा घेतला आढावा

0
16

तुमसर,दि.09 : तालुक्यातील महत्वाचे वर्दळीचे असलेल्या आणि उपतालुक्याचा दर्जा असणाऱ्या सिहोरा गावाला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांनी भेट देऊन विविध कामांची पाहणी केली,सोबतच आढावा सुध्दा घेतला.त्यांनी शाळा आणि अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर होते.

सिहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलने कात टाकण्यास सुरूवात केली आहे. एरवी या शाळेत विद्यार्थ्यांचा वनवा असताना या संख्येत वाढ झाली आहे. विद्यार्थी संख्येने तीन अंकी आकडा गाठला आहे. जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांचे प्रयत्नाने या शाळेत विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. यात गावकरी, शिक्षण समिती आणि प्राचार्य ओ.बी. गायधने यांचा सिहांचा वाटा आहे. शाळा बंद होण्याचे मार्गावर असताना पुन्हा शाळेने सकारात्मक प्रयत्नाने प्रगतीकडे वाटचाल करण्यास सुरूवात केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र जगताप यांनाही त्या शाळेला भेट देवून पाहणी करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी पाहणी करुन लागेल त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच जिल्हा परिषद शाळेचा नावलौकीक टिकवून राहावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

बालकांसोबत त्यांनी संवाद साधत अंगणवाडी सेविकांना काही सुचना दिल्या. याच गावात असणाºया पशु वैद्यकीय दवाखान्याची पाहणी त्यांनी केली. ग्रामपंचायत अंतर्गत गावात अनेक विकास कार्य करण्यात येत आहे. या कामाची स्थिती त्यांनी जाणून घेतली आहे. गावात लोकोपयोगी करण्यात येणारी कार्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सिहोरा गावात विविध विभाग आणि कार्यालयाचे भेट त्यांनी घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर, तुमसर पंचायत समितीचे बिडीओ मोहोड, सहायक बिडीओ मिलिंद बडगे, विस्तार अधिकारी ठवरे, पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, प्राचार्य ओ.बी. गायधने, सरपंच मधु अडमाचे तथा अन्य कर्मचारी उपस्थित होते.