विद्यापीठाची नवी 13  पॉइंट रोस्टर प्रणाली रद्द करा- महात्मा फुले समता परिषदेची मागणी 

0
20

जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

वाशिम,दि.11ः- – विद्यापीठाची नवी 13  पॉइंट रोस्टर प्रणाली रद्द करा व जुनी 200 पॉइंट व विद्यापीठाला एक घटक असलेली रोस्टर प्रणाली लागू करण्यासाठी केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाने अधिसूचना काढावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे .

निवेदनात म्हटले आहे की, मा उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा व निकालांचा हवाला देऊन विद्यापीठ अनुदान आयोग व  मानव संसाधन मंत्रालय यांनी यापूर्वी चे मागासवर्गीय आरक्षणासाठी असलेले 200 पॉइंट चे रोस्टर रद्द केले आहे .तसेच नव्या13 पॉईंट रोस्टर अनुसारच केंद्रीय विद्यापीठा मधिल सुमारे 6000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे . यामध्ये केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाने व त्यांच्या अधिनस्थ विद्यापीठ अनुदान  आयोगाने आरक्षण बिंदू नामावली साठी स्वतः च जाहीर केलेल्या 2006 च्या आरक्षण मार्गदर्शक तत्वांचा भंग करून तसेच 200 पॉइंट आरक्षण बिंदू नामावली आणि विद्यापीठाला एक घटक म्हणून मान्य असलेली आरक्षण प्रणाली रद्द केली .त्याऐवजी13 पॉइंट रोस्टर लागू केले आहे. हे ओबीसी व मागासवर्गीय यांचे उच्च शिक्षण व विद्यापीठ यामधील प्राध्यापक संवर्गातील आरक्षणच मागल्या दाराने रद्द करण्याचा डाव आहे.त्यामुळे विद्यापीठाची नवी 13  पॉइंट रोस्टर प्रणाली रद्द करून जुनी 200 पॉइंट व विद्यापीठाला एक घटक असलेली रोस्टर प्रणाली लागू करण्यासाठी केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाने अधिसूचना काढावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर समता परिषदेचे पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.अरविंद गाभणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव चोपडे ,जिल्हा उपाध्यक्ष सेवाराम आडे, विलासराव रोकडे, गोविंदराव राऊत, सुरेशराव गाभणे, मालेगाव तालुका अध्यक्ष गोरखनाथ भागवत, यशवंतराव हिवराळे, वाशिम शहर अध्यक्ष संतोष कदम कुणाल जैन,अशोकराव घुगे,रामदास सोनोने आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.