44 शहीद जवानांना विविध ठिकाणी श्रद्धांजली

0
24

आलापल्ली,दि.16…येथील स्व.मल्लाजी आत्राम बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित स्व.लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व ग्लोबल मीडिया केरला मॉडल इंग्लिश मीडियम शाळा आल्लापल्ली कडून जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या 44 जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आले.

सावलीः-जम्मू-काश्मीर पुलवामा येथे झालेल्या भारतीय जवानावर दहशतवादी हल्ल्यात भारत मातेच्या विरपुत्रांना सावली येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयांमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिट मौन पाडण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री .अविनाश जी
पाल तालुका महामंत्री सतीशजी बोम्मावार कोषाध्यक्ष अर्जुन जी भोयर जि.प.सदस्य सौ योगिताताई डबले सौ मनीषाताई चीमुरकर प्रकाश पा.गड्डमवार अशोक जी आकनुरवार प्रकाश जी खजांजी सुदर्शन चामलवारआशिष संतोषवार अभी संतोषवार मयूर गुरुनुले शहराध्यक्ष चंद्रकांत संतोषवार दिवाकर जी गेडाम तुळशीदास भुरसे तुकाराम जी कोंडेकर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपूरः- राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा, भारत व पवार समाज संगठन नागपूरच्यावतीने कुकडे लेआउट सभागृहात  पाकिस्तानी आतंकवादी द्वारा कश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या हल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी एन.डी.राऊत(अध्यक्ष अखिल भारतीय भोयर पवार महासंघ),मोतीलाल चौधरी(राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा),पृथ्वीराज रहान्गडाले(महासचिव, पवार समाज,नागपुर),सुरेश देशमुख(महासचिव राष्ट्रीय राजाभोज स्मारक समिति),ऊषा पटले(सदस्य राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा),कौशिक चौधरी(अध्यक्ष पश्चिम नागपुर),एम.चोपडे(महामंत्री),विजय पटले(अध्यक्ष उत्तर नागपुर),शिव पारधी(महासचिव गंगानगर),पराडकर,क्रिष्णाजी ढोबाले,एडवोकेट रूबी चौधरी,विनय बिसेन,जितेंद्र पटले अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नायगावःःपुलवामा येथे भारतीय सैन्यावर केलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध सभा घेऊन श्रध्दाजंली वाहण्यात आली. नायगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नायगाव येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहून शहीद जवानांना आदरांजली वाहिली.झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,मिनलताई पा खतगावकर,नायगाव तालुका अध्यक्ष धनराजजी शिरोळे,
बिलोली अध्यक्ष बिराजदार यांच्या सह तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्वच पदाधिकारी व शाखा प्रमुक बूथ प्रमुक तालुक्यातील सर्व कार्यकर्ते बहू संख्येने उपस्थित होते.

 

बाजार समिती मधे 42 शहीद बांधवांना श्रद्धांजली
अर्जुनी मोर :-जम्मु-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दुपारी अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ( सिआरपीएफ )ताफ्यावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. त्या सर्व शहीद विरांना अर्जुनी मोर कृषी उत्पन्न बाजार समिती चे वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बाजार समिती चे सभागृहात घेण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती काशिफजमा कुरेशी होते.यावेळी बाजार समिती चे उपसभापती लायकराम भेंडारकर .संचालक व्यंकट खोब्रागडे. खरेदी विक्री समितीचे संचालक भोजराज लोगडे. लैलेश शिवनकर. तथा दिपंकर उके. खांबी चे उपसरपंच देवानंद रामटेके. पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे. तथा बाजार समिती चे सर्व कर्मचारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी या भ्याडहल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध करुन व दोन मिनीटाचे मौन पाळुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.