तिरोडा,देवरी व अर्जुनीमोर वगळता सर्वंच तहसिलदाराचे स्थानांतरण

0
11

गोंदिया,दि.२१ः- नागपूर विभागातंर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीला घेऊन बदल्या करण्यात आलेल्या आहेत.त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तहसिलदारांच्याही बदल्या झाल्या आहेत.गोरेगावचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांची बदली आरमोरी येथे झाली असून गोरेगावला नरखेडचे तहसिलदार एस.एस.पुनसे यांची बदली झाली आहे.कामठीचे तहसिलदार बी.डी.टेळे यांची साकोली,भिवापूरचे तहसिलदार डी.जी.जाधव यांची सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा,सावनेरचे तहसिलदार राजू गणविर यांची समुद्रपूर,नागपूर येथील अप्पर तहसिलदार ए.डब्लू.खडतर यांची अपर तहसिलदार गोंदिया तर गोंदियाचे अपर तहसिलदार के.डी.मेश्राम यांची नागपूर येथे तहसिलदार (नझूल)जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून बदली झाली आहे.कुहीच्या तहसिलदार विनीता लांजेवार यांची बदली सडक अर्जुनी येथे,qहगणाचे तहसिलदार प्रताप वाघमारे यांना विभागीय आयुक्त कार्यालयात तहसिलदार(महसुल) येथे,कळमेश्वरच्या तहसिलदार डॉ.हंसा मोहने यांची विभागीय आयुक्त कार्यालयात तहसीलदार(जमीन),नागपूर निवडणुक तहसिलदार उज्वला तेलमासरे यांची तहसिलदार मुल,नागपूर(संगायो)तहसिलदार प्रिया कावळे यांची जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे अधिक्षक पदावर,नागपूर शहर तहसिलदार प्रियर्दर्शनी बोरकर यांची विभागीय आयुक्त कार्यालय(पुनवर्सन)तहसिलदार,सहायक जिल्हा पुुरवठा अधिकारी नागपूर लिना फलके यांची धान्य खरेदी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया,नागपूर अपर तहसिलदार जे.बी.पोहनकर यांची बल्लारपूर.जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथील अधिक्षक विनोद मेश्राम यांती मोहाडी तहसिलदार,देवळीचे तहसिलदार डी.सी.बोंबार्डे यांची सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा,साकोलीचे तहसिलदार अरqवद qहगे यांची तहसिलदार कामठी,मोहाडीचे तहसिलदार सुर्यकांत पाटील यांची तहसीलदार नागपूर शहर,भंडारा जिल्हा कार्यालायतील अधिक्षक आर.डी.पटले यांची अपर तहसिलदार अ.कृ.क्र.२ नागपूर.सडक अर्जुनीचे तहसिलदार आर.एस.अरमरकर यांची खरेदी अधिकारी गडचिरोली,आमगाव तहसिलदार एस.टी.राठोड यांची भिवापूर,सालेकसा तहसिलदार सी.आर.भंडारी यांची कोरची.जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक के.वाय.कुणारपवार यांची तहसिलदार गडचिरोली,गोंदिया तहसिलदार राहुल सारंग यांची खरेदी अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर.गडचिरोलीचे तहसिलदार डी.एस.भोयर यांची आमगाव तहसिलदार याप्रमाणे बदल्या करण्यात आल्या आहेत.