पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा वाशिममध्ये निषेध

0
24

वाशिम,दि.01 मार्च : मंगरुळपीरचे तहसिलदार वैशाख वाहुरवाघ यांनी २७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा प्रत्रकार प्रा. नंदलाल पवार, फुलचंद भगत व अन्य एका जणाविरुध्द पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता मध्यरात्री दरम्यान या तिघांना अटक केली होती. सदर तक्रार व कारवाई आकसबुध्दीने झाल्यामुळे जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धारणे देवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. तद्नंतर वाशिम जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना वाहुरवाघ यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवदेन देण्यात आले.
पत्रकारांनी दिलेल्या निवेदनानुसार मंगरुळपीर येथील तहसिल कार्यालयातील रेती तस्करीची क्लिप माहे डिसेंबर २०१८ मध्ये भ्रमणध्वनीवर सार्वजनिक झाली होती. या क्लिपमध्ये तहसिल कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे आर्थिक देवाण-घेवाणीचे संभाषण होते. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर, जिल्हाधिकारी वाशिम, विभागीय आयुक्त अमरावती व इतर वरिष्ठांना वेळोवेळी दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. तर पत्रकारांनी या निवेदनाच्या आधारे वर्तमानपत्रात वृत्त प्रकाशित केले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त अमरावती यांनी अप्पर जिल्हाधिकारी वाशिम यांना दिलेले आहेत. याप्रकरणाच्या बातम्या प्रकाशित केल्याने मंगरुळपीर येथील तहसिलदार वैशाख माहुरवाघ यांनी आकसापोटी २७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पोलिसात खोटी तक्रार देऊन दै.लोकमतचे मंगरुळपीर तालुका प्रतिनिधी प्रा. नंदलाल पवार व टी. व्ही. वेब न्युजचे प्रतिनिधी फुलचंद भगत यांचेवर खंडणी व जातीवाचक शिवीगाळ केल्याचे खोटे गुन्हे दाखल केले. तसेच प्रा. नंदलाल पवार यांची २५ जानेवारी २०१९ रोजी जिल्हाधिकारी वाशिम यांनी संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती; परंतु त्यांनी बातम्या प्रकाशित केल्याने तहसिलदार यांनी संजय गांधी निराधार योजनेची सभा बोलावली नाही. प्रा. पवार यांनी तहसिलदार यांना दोन वेळा योजना समितीची सभा घ्या याबाबत लेखी पत्र दिले. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सुध्दा प्रा. पवार यांनी लेखी पत्र दिले असून तहसिलदार यांनी त्यांचे तक्रारीत २५ रोजीच प्रा. पवार व इतरांनी पैसे मागितल्याची खोटी तक्रार दाखल केली आहे. ही घटना पत्रकारांच्या लेखणीवर बंधनं आणणारी व पत्रकारितेची मुस्कटदाबी करणारी असून यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे निवेदनात नमुद केले आहे. तसेच पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणार्‍या तहसिलदारावर कठोर कारवाई करावी व पत्रकारांवर पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे खारीज करावे; अन्यथा जिल्ह्यातील पत्रकार तीव्र आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष माधवराव अंभोरे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष शौकत अली मीर साहेब, विभागीय सचिव जगदीश राठोड, कार्यालयीन सचिव नंदकिशोर शिंदे, प्रदेश प्रतिनिधी शिखरचंद बागरेचा, सरचिटणीस विश्वनाथ राऊत, नंदकिशोर नारे, अजय ढवळे, मंगलदादा इंगोले, प्रमोद लक्रस, राजदत्त पाठक, बाळासाहेब देशमुख, गणेश भालेराव, राम चौधरी, राम परंडे, महेश बपोरीकर, प्रा. अरविंद गाभणे, सुनिल कांबळे, सुनिल पाटील, प्रा. विजय देशमुख, सुनिल काकडे, सुनिल मिसर, राजेश दबडे, महादेव हरणे, संदीप पिंपळकर, नाना देवळे, नंदकिशोर वैद्य, शरद येवले, गणेश मोहळे, बि.के. कोडापे, राजकुमार पडघान, संतोष वाघमारे, ग.ना.कांबळे, अरविंद उचित, शाकीर शेख, राजीव वाघमारे, डॉ. सुधाकर क्षीरसागर, प्रल्हाद निळकंठराव महाजन, सुधिर देशपांडे, दिलीप राऊत, आरिफभाई पोपटे, गजानन गवई, सुनिल भगत, राजेश माने, रमेश उंडाळ, प्रदिप सालवणकर, सुनिल भुतडा, गजानन देशमुख, इमरान खान, यशवंत हिवराळे, विनोद तायडे, प्रफुल बानगावकर, पंकज गाडेकर, रुपेश बाजड, संतोष वानखडे, प्रविण पट्टेबहादुर, शंकर आडे, शितलकुमार धांडे, दादाराव गायकवाड, नारायण अव्हाळे, शरद येवले, सुखदेव लोणकर, ज्ञानेश्वर कव्हर, शिवशंकर भोयर, राजीव वाघमारे, एस. बी. चव्हाण, नंदु गावंडे, अशोक राऊत, यशवंत हिवराळे, महादेव हरने, गजानन देशमुख, सतिष सावके, अरविंद उचित, प्रविण पट्टेबहाद्दुर, यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

शासनाची भूमिका पत्रकारांना न्याय देण्याची राहणार – जिल्हाधिकारी

मंगरुळपीरचे पत्रकार प्रा.नंदलाल पवार व फुलचंद भगत यांचे विरुध्द तहसिलदार वाहुरवाघ यांनी खंडणी व अ‍ॅट्रासीटी गुन्हे दाखल केले ही बाब अत्यंत गंभीर असून, तहसिलदारांनी अशा प्रकारची घिसाडघाई करण्याचे कारण काय? याची चौकशी जिल्हाप्रशासन त्वरीत करुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कुठेही त्रास होईल, असे होऊ देणार नाही. जिल्हाधिकारी या नात्याने आपण जातीने या प्रकरणी लक्ष देऊन पत्रकारांना न्याय देऊ, असे ठोस आश्वासन जिल्हाधिकारी ऋषिकेष मोडक यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले.
जिल्हाधिकारी ऋषिकेष मोडक यांना पत्रकारांवर झालेल्या अन्यायाबाबत न्याय मागण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार भेटले त्यावेळी त्यांनी माध्यमांनी जिल्हाप्रशासनाला सहकार्य करावे , असे सांगुन यापुढे जिल्ह्यातिल पत्रकारांना नक्कीच योग्य ते सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.