शहीद राणी अवंतीबाई आदरणीय महिलेचा लढा : सरपंचा रिता  मसरके

0
25
सालई खुर्द , दि. २० :  : शहीद अमर महाराणी राणी अवंतीबाई लोधी यांना दि. २० मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय देव्हाडी येथे सन १८५७ ची स्वतंत्र संग्राम विरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा बलिदान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शहीद राणी अवंतीबाई यांच्या प्रतिमा वर पुष्पगुच्छ अर्पित करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी देव्हाडीचे सरपंचा रिता चैनलाल मसरके, उपसरपंच लव बशीने, ग्रामसेवक बावनकुळे, लोधी समाज जिल्हा अध्यक्ष अनंतलालजी दमाहे (गुरुजी), सामाजिक कार्यकर्ता श्यामसुंदर नागपुरे,लोधी प्रचारक खुशाल नागपुरे,ग्रा.पं.सदस्या राजकुमारी लिल्हारे, ग्रा.पं.सदस्या कुंदा बोरकर, ग्रा.पं.सदस्या ललिता नागपुरे, ग्रा.पं.सदस्या रत्नाताई मेश्राम, ग्रा.पं.सदस्या विमल बोंदरे, ग्रा.पं.सदस्य देवेंद्र शहारे, ग्रा.पं.सदस्य न्यानेश्वर बिरनवारे, आदी उपस्थित होते.
बलिदान दिनानिमित्त सरपंच रिता मसरके, बोलत होते की, राणी अवंतीबाई लोधी यांनी देशाचे पहिले स्वातंत्र्य सेनानी आणि आदरणीय महिलेचा लढा दिला. आणि सर्व प्रथम, ब्रिटीश विरुद्ध तलवार हाती घेतली, अवंतीबाई संपूर्ण देशात क्रांतिकारक महिला म्हणून ओळख निर्माण केली. राणी अवंतीबाई लोधी देशातील पहिल्या महिला स्वातंत्र्य संग्राम सेनानी होत्या,एवढेच नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामात सशस्त्र क्रांतीचा पाया त्यांनीच रोहला होता. आजच्या काळात राणी अवंतीबाई यांची विरकथा फक्त महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन देव्हाडीचे सरपंचा रिता चैनलाल मसरके यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगीलोधी समाज जिल्हा अध्यक्ष अनंतलालजी दमाहे (गुरुजी) बोलत होते की, वीरांगना अवंतीबाई केवळ बालपणीच एक नायक आणि पराक्रमी होते. अवंतीबाई मोठे झाल्याने, तिच्या भव्य किरणांना त्याच्या परिसरात पसरू लागल्या होत्या, राजा राजकुमार सिंह यांच्या मृत्यूनंतर महाराणी अवंतीबाई लोधी यांनी लढा आपल्या हातात घेतला आणि १८५७ च्या काळात स्वातंत्र्य आंदोलन सुरू केले, अवंतीबाईनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रणभूमीवर लढल्या त्यात त्या अमरशहीद बलीदान झाल्या. राणी अवंतीबाई फक्त लोधी समाजाच्या ओबीसी महिला नव्हे तर स्वतंत्र भारताच्या गौरव असल्याचेही मत यावेळी  जिल्हा अध्यक्ष अनंतलालजी दमाहे   यांनी व्यक्त केले.