लोकसभा निवडणूक : ३४ पैकी ११ अर्ज रद्दŸ,२३ उमेदवारांचे अर्ज वैध

0
21

भंडारा, दि. २६ – भंडारा – गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३४ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. आज या अर्जांची छाननी करण्यात आली असून छाननी नंतर ३४ पैकी ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले असून २३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. २८ मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख असून या नंतर चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारांची माहिती पुढील प्रमाणे आहे.नामांकन वैध झालेले उमेदवारामध्ये नाना पंचबुध्दे(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),विजया राजेश नांदुरकर(बहुजन समाज पार्टी),सुनिल बाबुराव मेंढे(भारतीय जनता पार्टी).नान्हे कारु नागोजी(वंचित बहुजन आघाडी),भिमराव दुर्योधन बोरकर(पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमाक्रॉटीक)भोजलाल मरसकोल्हे(भारतीय शक्ती चेतना पार्टी),राजकुमार भेलावे(पिपल्स रिपब्लीकन पार्टी),अतुल हलमारे,आमकर ग्यानीराम बाजीराव,कलचुरी निलेश,गजभिये प्रमोद हिरामन,जायस्वाल विरेंद्रकुमार कस्तुरचंद,तारका देविदास नेपाले,देविदास संतुजी लांजेवार,निर्वाण राजु रामभाऊ,पटले राजेंद्र सहसराम,प्रकाश मालगावे,खुशाल परसराम बोपचे,मुनिश्वर दौलत काटेखाये,विलास जियालाल राऊत,सुनिल संपत चवळे,सुमित विजय पांडे व सुहास अनिल फुंडे या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.