मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकांचे दुसरे सरमिसळीकरण पूर्ण  

0
35
  • सर्वसाधारण निवडणूक निरीक्षकांची उपस्थिती

वाशिम, दि. २७ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची दुसरी सरमिसळीकरण प्रक्रिया आज निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) सुधीरकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झाली.यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार आदी उपस्थित होते.

निवडणूक कामकाजासाठी जिल्ह्यातील ४६२ विविध शासकीय कार्यालयांतील ६६१५ पुरुष व १३५३ महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंद निवडणूक आयोगाच्या संगणकीय प्रणालीत करण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रस्तरीय पथके तयार करण्यासाठी आज भारतीय निवडणूक आयोगाच्या संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने दुसरी सरमिसळीकरण प्रक्रिया झाली. यामाध्यमातून आता विधासभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची पथके नेमून देण्यात आली. ही पथके तयार करताना संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ज्या विधानसभा मतदारसंघाचा रहिवासी आहे अथवा ज्या विधानसभा मतदारसंघात कार्यरत आहे, अशा विधानसभा मतदारसंघ वगळून इतर मतदारसंघात त्याची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्रांच्या तुलनेत सुमारे १० टक्के पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.

यानंतर तिसऱ्या टप्प्यातील सरमिसळीकरण प्रक्रिया संबंधित लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर होणार असून याद्वारे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकांना मतदान केंद्रांनिहाय नेमणूक दिली जाणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय नेमून दिलेली पथके

विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्रे

(नवीन २१ प्रस्तावित मतदान केंद्रांसह)

नेमणूक करण्यात आलेली पथके
३३-रिसोड ३३४ ३६६
३४-वाशिम ३७५ ४१३
३५- कारंजा ३५५ ३९१
एकूण १०६४ ११७०