निवडणूक निरिक्षकांच्या उपस्थितीत ईव्हिएम मशीनचे सरमिसळीकरण

0
17

भंडारा , दि. 30 – 11-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ निवडणूकीकरीता 11 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी लागणाऱ्या ईव्हिएम-व्हीव्हीपॅट मशीनचे मुख्य निवडणूक निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुसरे सरमिसळीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भुसारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, एनआयसीचे सूचना विज्ञान अधिकारी संदिप लोखंडे, पंकज गजभिये व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 ईव्हिएम-व्हीव्हीपॅटचे सरमिसळीकरण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. त्यानुसार आज सरमिसळीकरण करण्यात आले. यात तुमसर विधानसभा-356 मतदान केंद्र, 430 बॅलेट युनीट, 430 कंट्रोल युनिट, 463 व्हीव्हीपॅट. भंडारा विधानसभा- 456 मतदान केंद्र,  550 बॅलेट युनीट, 550 कंट्रोल युनिट, 592 व्हीव्हीपॅट. साकोली विधानसभा-394, मतदान केंद्र, 475 बॅलेट युनीट, 472 कंट्रोल युनिट, 512 व्हीव्हीपॅट.अर्जुनी मोरगाव-316 मतदान केंद्र, 373 बॅलेट युनीट, 373 कंट्रोल युनिट, 406 व्हीव्हीपॅट. गोंदिया विधानसभा-360 मतदान केंद्र, 423 बॅलेट युनीट, 423 कंट्रोल युनिट, 559 व्हीव्हीपॅट. तिरोडा विधानसभा-295 मतदान केंद्र, 346 बॅलेट युनीट, 346 कंट्रोल युनिट,375  व्हीव्हीपॅट मशीनचे सरमिसळीकरण करण्यात आले.