पारडीत जलसंधाणासाठी उद्योजक प्रवीण ठवळी यांची मदत

0
30
मोर्शी,दि.24 :राज्यात सर्वत्र पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक गावात जलसंधारण ची कामे सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात यावर्षी अनेक गावात जलसंधारणची कामे मोठ्या प्रमाणात  सुरू आहेत. तालुक्यात बावीस गावात श्रमदानाचे जोरात काम सुरू आहे मागच्या वर्षीही सहभागी झालेले पारडी हे गाव यावर्षीही सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला नाही, परंतु पाणी फाउंडेशनची टीम आणि गावातील उद्योजक प्रवीण ठवळी यांनी जलसंधारण कामासाठी पाच हजाराचे  कुदळ आणि फावडे मदत म्हणून दिले . यामुळे गावातील जलयोध्यानी आपली टीम तयार करुन आपण आपल्या गावसाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून आता कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता गावात तुफान आलंय असच म्हणावे लागेल.
मोर्शी तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. त्यामध्ये पाणी फाउंडेशन आणि ग्रामस्थांचा जितका सहभाग आहे तेवढंच त्यांना मदत करणाऱ्या हातांचा सुद्धा आहे. पारडी  गावात मुलांनी जलसंधारनाची चळवळ उभी केली आहे . ग्रामस्थांनी जलसंधारण काम गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र पाणी फाउंडेशनच्या टीमने सभा घेतल्यानंतर गावातील प्रशिनार्थी व मुलांनी कामाला सुरुवात केली परंतु  या कामासाठी साधन सामग्री कामी होती. त्यामुळे थोडी अडचण होती.
ही माहिती पुण्याला गेलेले आणि उद्योजक झालेले प्रवीण ठवळी यांना समजले.  गावातील मुलं पाण्यासाठी काम करत आहे . आपल्या गावासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. मुलांना  जलसंधारणाच्या कामसाठी पुरेसे साहित्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांनी गावासाठी तब्बल ५००० रुपयांचे  कुदळ आणि फावडे भेट दिली. कामासाठी सर्व साहित्य आल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आता पारडीतील जलयोध्ये व जलरागिनी उत्साहाने काम करू लागले आहेत.