१२ मे पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

0
16

वाशिमदि. २४ :  जिल्ह्यात १ मे २०१९ रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन साजरा होणार आहे. तसेच ७ मे २०१९ पासून मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होत आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी २७ एप्रिल ते १२ मे २०१९ दरम्यान वाशिमचे जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश यांनी लागू केला आहे.

या कालावधीत शस्त्रेसोटेतलवारीभालेदंडेबंदुकासुरेलाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणेकोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणेदगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणेजमा करणे किंवा तयार करणे,  व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणेवाद्य वाजविणे,किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणाभाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्राधार्मिक विधीसामाजिक सणलग्न सोहळेशासकीय सेवेत तैनात कर्मचारीसार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहेरंगमंचविभिन्न भागामध्ये निश्चित दिवस ठरवून दिलेले आठवडी बाजार आदी ठिकाणी हा आदेश लागू राहणार नाही. उपविभागीय अधिकारी यांना या आदेशामधून समोचित प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून सूट देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.