सेंद्रीय भात लागवडीसाठी रथयात्रेतून प्रचार, अदानी फाऊंडेशनचा उपक्रम

0
18

तिरोडा,दि.24: अदानी फाऊंडेशन व कृषी विभाग महाराष्ट्र शासन तिरोडाच्या वतीने शेतकèयांमध्ये श्री पद्धतीने सेंद्रीय शेती भात लागवडीसाठी जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने तिरोडा तालुक्यातील एकुण ६५ गावामध्ये प्रचार रथाच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येत आहे.प्रचार रथाचे पूजन तिरोडा उपविभागीय अधिकारी जी.एम. इळपाडे, तालुका कृषी अधिकारी मंगेस वावधने, अदानी पावर प्रमुख सी.पी.साहू व कृषी विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
प्रचार रथाच्या माध्यमातून श्री पद्धतीने सेंद्रीय भात लागवड केल्यास शेतकèयांना होणारे फायदे तसेच सेंद्रीय शेती कसा पद्धतीने करायला पाहिजे या विषयीचे मार्गदर्शन कृषी विभागाचे कर्मचारी, अदानी फाउंडेशनचे कर्मचारी यांच्याद्वारे बैठकांचे आयोजन करुन करण्यात येत आहे. शेतकèयांमार्फत प्रचार रथाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचार रथाच्या माध्यमातून श्री पद्धती सोबतच सेंद्रीय शेतीकरिता लागणारी सेंद्रीय खते व किडनियंत्रतके जसे गांडूळ खत, दशपर्णी अर्क, जिवामृत, ब्रम्हास्त्र, अग्नीअस्त्र, निमास्ट, बिजामृत हे कशाप्रकारे तयार केले जाते. याविषयी माहिती प्रचार रथाद्वारे शेतकèयांना दिल्या जात आहे.
अदानी फाउंडेशन हेड नितीन शिराळकर यांनी श्री पद्धतीने सेंद्रीय भात लागवड या कार्यक्रमात जास्तीत-जास्त शेतकèयांनी सहभागी होवून श्री पद्धतीने सेंद्रीय भात लागवड करावी असे आवाहन केले.
मागील वर्षात ५००० शेतकèयांनी एकुण ८९३९ एकर शेतीमध्ये श्री पद्धतीने सेंद्रीय भात लागवड केली. त्यामध्ये त्यांच्या एकरी २३ टक्के उत्पादनात वाढ व २६ टक्के लागवड खर्च कमी झाला. पारंपारीक भात लागवड व श्री पद्धतीने सेंद्रीय भात लागवड यांच्या तुलनेत सरासरी एकणी ८३३० रुपये शेतकèयांचा फायदा झाला.