क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतुक करताना टिप्पर जप्त

0
19

देवरी,दि.२७ः-देवरी-आमगाव राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे.या रस्ता बांधकामाचे कंत्राट असलेल्या एम.बी.पटेल कंपनीच्या वतीने तर चांगलाच राजकीय दबाव अधिकाèयावर आणून हम करे सो कायदा करण्यास सुरवात करण्यात आली आहे.२६ एप्रिलच्या रात्री ८.३० वाजेच्या सुमारास देवरी येथील राधिका हॉटेलसमोरून एम.बी.पटेल कंन्स्ट्रक्शन कंपनीचे ३ ट्रक रेतीची वाहतुक करीत असल्याचे महसुल विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले असता त्यांनी त्या ट्रकला थांबवून तपासणी केली.तेव्हा ३ ट्रकमध्ये ५ ब्रासच्यावर रेती असल्याचे लक्षात आले जेव्हा की वाहतुकीचा परवाना हा फक्त ३ ब्रास क्षमतेचा होता.अशाप्रकारे ३ ट्रकच्या माध्यमातून ६ ब्रास रेतीची अवैध वाहतुक एम.बी.पटेल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ट्रकमधून होत असताना नायब तहसिलदार ओंकार ठाकरे,मंडळ अधिकारी qसधीमेश्राम,तलाठी तीतरे,तलाठी गजबे,तलाठी मुंढरे यांच्या विशेष पथकाने पकडले आणि कारवाई केली.या कारवाईनंतर मात्र तहसिलदारावर राजकीय व प्रशासकीय दबाव घालून सदर ट्रक सोडण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती हाती आली आहे