जिल्हाधिकारी नवल यांची मोर्शीतील वॉटर कपस्पर्धेतील गावांना भेटी

0
19
अमरावती,दि.27ः- जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सुरु असलेल्या वाॅटर कॅपस्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील नागरिकांशी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.मोर्शी तालुक्यातील शिरजगाव,लेहगाव,भिवकुंडी या गावांना जिल्हाधिकारी नवल यांनी भेटी देऊन वॉटर कॅपच्या कामाबद्दल  गावकऱ्यांसोबत चर्चा केली .मनरेगांतर्गत तसेच वनविभागाच्या कामाबद्दल येणाऱ्या अडचणीबद्दल करुन त्या दुर करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. मनरेगा विभागतील कामे लवकरच पूर्ण करून देऊ असे गावकऱ्यांना सांगितले. शिरजगावमधील श्रमदानाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन ग्रेडेडची पाहणी केली.लेहेगाव मधील मनरेंगाच्या कामाची पाहणी केली.  त्यानंतर भिवकुंडी या आदिवासी गावाला भेट देत आदिवासी नागरिकांसोबत श्रमदानाच्या ठिकाणी आदिवासी नुत्य करून त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी  तहसीलदार, वनविभाग अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, कृषी विभाग अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी व पाणी फाऊंडेशनची चमू उपस्थित होती.