अड्याळ येथे ट्रकची चारचाकीला धडक 2 ठार,तिरोड्यात कंटेनरच्या धडकेत युवती ठार

0
19

पवनी,दि.27ःः तालुक्यातील अडयाळ (सहायत नगर) येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर आज दुपारी झालेल्या एका अपघातात गौणखनिजाची वाहतुक करणार्या ट्रकच्या धडकेत चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला कोलमडून झालेल्या अपघातात चारचाकी वाहनातील(एमएच31,डीसी 6176) 2 ठार तर 2 जण जखमी झाल्याची घटना घडली.मृतामध्ये उमरेड(मोहपा)येथील दोघांचा समावेश असल्याचे वृत्त असून नाव अद्यापही कळलेले नाही.

मांडवी येथे महिलेची हत्या

तुमसर तालुक्यातील मांडवी येथे घरगुती वादात धारदार शस्त्राने पत्नीचा खून केल्याची घटना घडली असून मृत महिलेचे नाव लक्ष्मी आतिश कोटांगले (२७) असे आहे.

तिरोडा येथे कंटेनरच्या धडकेत युवतीचा मृत्यू

तिरोडाः- तालुक्यातील बिर्सी ते लाखेगाव मार्गावर असलेल्या बोपेसर येथे आज दुपारी झालेल्या अपघातात 19 वर्षीय युवतीचा कंटेनरच्या धडकेत घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर मृत युवतीचे नाव कु. आरती खेमराज पटले (रा.ठाणेगाव,ता.तिरोडा)असे आहे.