जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नाला खोलीकरणाची कामे करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0
14
वाशिम, दि. 09 :  जलयुक्त शिवार अभियान 2018-19, दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत वाशिम तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत सिमेंट नालाबांध खोलीकरण व गाळ काढणेची 147 कामे प्रस्तावित आहेत. ही कामे लोकसहभाग, ग्रामपंचायत अथवा खाजगी व्यक्ती किंवा अशासकीय संस्था यांच्यामार्फत यंत्रसामग्री उपलब्ध करून देऊन मृद व जलसंधारण विभागाच्या 4 सप्टेंबर 2017 रोजीच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार 27 रुपये प्रति घनमीटर इतक्या कमाल दराने जिल्ह्यातील इच्छुक संयंत्रधारकामार्फत पूर्ण करावयाची आहेत.
वाशिम तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाची 2018-19 मधील प्रस्तावित कामांची सविस्‍तर यादी वाशिम तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे उपलब्‍ध आहे. ही कामे करण्‍यासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या 4 सप्टेंबर 2017 रोजीच्या परिपत्रकानुसार सर्वप्रथम संबंधित गावातील संयंत्रधारक, त्यानंतर तालुक्यातील संयंत्रधारक व त्यानंतर जिल्ह्यातील सयंत्रधारकांना प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक सर्वसयंत्रधारकांनी 13 मे 2019 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपला अर्ज तालुका कृषी अधिकारी, वाशिम कार्यालयात सादर करावा, यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी, असे वाशिमचे तालुका कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.