नगरांतर्गत रस्ता अपघात टाळण्यासाठी न.पं.चा पुढाकार

0
8

गोरेगाव,दि.17 : नगराअंतर्गत रस्त्यांवर स्टंटबाजी करणाNया युवकांची काही कमी नाही. मात्र, त्यामुळे नगरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अपघातांमध्ये चिमुकल्यांसह मोठेही जखमी होत आहेत. ही बाब लक्षात घेत गोरेगाव येथील नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी नगरांतर्गत रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याचा निर्णय घेतला. गोरेगावातील गल्लीबोड्यांच्या रस्त्यांवर ब्रेकर बनविण्यात आले आहेत. हा उपक्रम स्तुत्य ठरला असून जिल्ह्यात या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. गोरेगाव हे नगर गोंदिया – कोहमारा या मुख्य मार्गावर वसलेले आहे. गोरेगावची व्याप्ती मुख्य मार्गावर जवळपास ३ कि.मी. आहे. एवढेच नव्हे तर गावाची संपूर्ण वसाहत जवळपास ५ ते १० कि.मी. अंतराचे आहे. त्यातच गोरेगावातील प्रत्येक वार्डात सिमेंट रस्त्यांचे बांधकामही झाले आहे. नगरांतर्गत रस्ते गुळगुळीत झाल्यामुळे सुसाट वेगाने स्टंटबाजी करणाNया तरुणांची काही कमी राहिली नाही. त्यामुळे नगरांतर्गत रस्त्यांवर अपघात होत असतात. अपघातात बच्चे वंâपनी मोठ्या प्रमाणात जखमी होत आहेत. या बाबीची दखल घेत नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी गावातील मार्गांवर बे्रकर बसविण्याचा निर्णय घेतला. गोरेगाव नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी या निर्णयाला सहमती दर्शविली. परिणामी, आजपासून गोरेगावातील रस्त्यांवर ब्रेकर बसविले जात आहेत. या स्तुत्य उपक्रमामुळे गावातील रस्त्यांवरील अपघातांवर आळा बसणार, अशी आशा बाळगली जात आहे. हे उपक्रम गोरेगावसह जिल्ह्यासाठी कौतुकास्पद ठरले आहे.