आपदग्रस्त कुटुंबांना आमदारांकडून आर्थिक मदत

0
14

गोंदिया,दि.17 : तालुक्यातील ग्राम बनाथर व बरबसपुरा येथील आपदाग्रस्त कुटुंबाना आमदार गोपालदास अग्रवाल यांच्याकडून प्रत्येकी अडीच हजार रूपयाची आर्थिक मदत करण्यात आली. बनाथर येथील सुखदास माने व बरबसपुरा येथील रामचंद गराडे यांना विशाल अग्रवाल यांच्या हस्ते मदत निधी देण्यात आली. बनाथर येथील सुखदास माने व बरबसपुरा येथील रामचंद गणेश गराडे यांच्या घराला आग लागली.यात दोन्ही कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची सुचना क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना मिळताच त्यानी दोन्ही कुटुंबाना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने प्रत्येकी अडीच हजार रूपयाची मदत केली. आमदारांच्या जनसंपर्वâ कार्यालयात विशाल अग्रवाल यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली