मोबदल्यासाठी ग्राम रोजगार सेवकाचा उपोषणाचा इशारा

0
21

अर्जुनी मोरगाव,दि.१९:-तालुक्यातील नवनीतपूर येथील ग्राम रोजगार सेवक जयपाल वाघमारे याला कामावरून कमी करण्यात आले. त्याच्या कार्यकाळातील कामाचा मोबदला, मानधन देण्यास गेल्या ६ महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत आहे. अखेर त्रस्त होऊन ग्राम रोजगार सेवकाने ग्रामपंचायत प्रशासनीला कोटार्चे नोटीस देऊन मानधन द्या; अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यामुळे ग्रामपंचायत व तालुका प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
सविस्तर वृत्त असे, ग्राम रोजगार सेवक जयपाल श्यामराव वाघमारे हे ग्रामपंचायत नवनीतपूर येथे १ मे २0११ पासून ते १९ डिसेंबर २0१८ पयर्ंत रोजगार सेवक पदावर कार्यरत होते. या काळात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे कामे झाली. त्यातील संपूर्ण मजुरांची मजुरी, सर्व कार्यालयीन कामकाज पार पाडले. त्यानंतरच्या कालावधीत त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने कामावरून कमी करून घेतले.
कमी करून घेताना त्यांनी सर्व कागदपत्रे सादर करून घेतली होती सेवा काळातील लोकांची कामे करून घेतली होती. मात्र त्यांचे सेवा काळातील कामावरचे कमिशन त्यांना पंचायत समितीच्या फंडातून ग्रामपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द होऊनसुद्धा मागील ६-७ महिन्यांपासून केवळ राजकीय डावाने व ग्रामसेवकाच्या हेतूपुरसपर मानधनापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.