ब्राम्हण समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आज

0
22

गोंदिया,दि.१९:-येथील ब्राम्हण समाजाच्या वतीने दरवषीर्नुसार यंदाही सामूहिक विवाह व उपनयन संस्कार (यज्ञोपवित संस्कार) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या वतीने मागील पन्नास वर्षांपासूनची ही परंपरा सुरू असून आज १९ मे रोजी आयोजित या समारंभाने ही परंपरा कायम राहणार आहे. स्थानिक पवार सांस्कृतिक भवन येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात येणार आहे. ज्यामध्ये सकाळी ८ वाजता मांगरमाटी, खंब स्थापना, मातृका पुजन, १0 वाजता उपनयन संस्कार कार्यक्रम तर ५ वाजता अतिथींचे स्वागत व रात्री साडे अकरा वाजता पाणिग्रहण संस्कार होणार आहे. तेव्हा या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधू-वरास शुभाशिर्वाद देण्याचे आवाहन संयोजक अध्यक्ष भारत शुक्ला, कार्यकारी अध्यक्ष सुनील तिवारी व कोषाध्यक्ष ओमप्रकाश तिवारी यांनी केले आहे.