तेंदूपाने तोडायला गेलेल्या महिलेचा विज पडून मृत्यू

0
18

गडचिरोली,दि.२२ ः-  जिल्ह्यातील अतीदुर्गम असलेल्या अहेरी तालुक्यातील आलदंडी येथे आज सकाळच्या सुमारास तेंदुपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेचा विज पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत महिलेचे नाव बेबी चैनु आत्राम (३४) असे आहे. बेबी आत्राम ही आज बुधवारला तेंदुपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेली होती. दरम्यान विजांचा कडकडाट सुरू होऊन अचानक अंगावर विज कोसळल्य़ामुळे तिचा मृत्यू झाला.तिच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.