प्रशासन अधिकारी खोब्रागडेविरुध्द राज्य महिला आयोगाकडे तक्रार;महिला कर्मचारी छळ प्रकरण

0
54

गोंदिया,दि.04 : गोंदिया जिल्हा परिषद ही आयएसओ प्रमाणपत्र मिळालेली जिल्हा परिषद आहे.परंतु कामकाज बघितले एकही त्या प्रमाणपत्रासारखे नाही.विविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहिलेल्या या जिल्हा परिषद पुन्हा एका नव्या विषयाने चर्चेत आली आहे. मी जे सांगते तेच काम करा,बोलावतो तेव्हा या, असे अरेरावीपणाचा परिचय देत आस्थापना विभागातील एका विधवा महिला कर्मचारीचा हेतुपुरस्पर छळ सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासन अधिकार्याकडून केला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.यासंदरभात पिडीत महिला कर्मचारीने या संदर्भाची तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षकासह राज्य महिला आयोगाकडे केली आहे.याप्रकरणावरुन जिल्हापरिषदेतील महिला कर्मचारी या सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.यापुर्वी सुध्दा काहीवर्षापुर्वी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या अधिकार्याविरुध्दही अशीच तक्रार झाली होती.तेव्हा तत्कालीन कृषी विभागाच्या महिला अधिकारी यांनी चौकशी सुध्दा केली होती.

आता परत तशाच विषय निर्माण झाल्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयात एकच चर्चा सुरू झाली आहे. सदर पिडीत महिलेने सामान्य प्रशासन विभागात सहायक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत दिवाकर खोब्रागडे यांच्या विरोधात तक्रार  केली आहे. तक्रारकर्ती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत आहे. सदर महिला कर्मचारीने दिलेल्या तक्रारीनुसार सामान्य प्रशासन विभागात कार्यरत सहायक प्रशासन अधिकारी दिवाकर खोब्रागडे हे नेहमीच पिडीत कर्मचारी महिलाच्या वैयाक्तीक भ्रमणध्वनीवर संपर्क करून अकार्यालयीन भाषेचा वापर करतात. एवढेच नव्हेतर सार्वजनिक ठिकाणी हेतुपुरस्पर अपमानास्पद वागणूक देवून गेल्या काही दिवसांपासून त्रास देत आहेत. २४ जून रोजी सकाळी ११ वाजता सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने एका गुन्ह्याच्या तपासाकरीता शासकीय पंच म्हणून पिडीत महिला कर्मचारीला जबाबदारी सोपविण्यात आली. सदर जबाबदारी पार पाडत असताना पिडीत महिला कर्मचारीच्या विभागाचे कामे प्रलंबित राहिले. त्या अनुषंगाने पिडीत कार्यालयात परत गेली. त्यावेळी पुन्हा भ्रमणध्वनीवर संपर्क करून आस्थापना विभागात खोब्रागडे यांनी बोलाविले. मात्र, कामानिशी काहीही न बोलता पुर्व प्रदूषित हेतुने व जाणीवपूर्वक बोलावून असभ्य वर्तुवणूक दिली. यावेळी त्या ठिकाणी एक महिला व एक पुरूष कर्मचारी हजर होते. एवढ्यावरच न थांबता खोब्रागडे यांनी तुम्ही माझी कुठेही तक्रार करा, सीईओ माझ्या खिश्यात राहतात. तु नोकरी कशी करतेस आणि तुझ्या अधिकार्याचे शहाणपण कसे चालते, जास्त केल्यास निलंबित करणार, अशी चक्क धमकी दिली. असा आरोप पिडीत महिला कर्मचारीने केला आहे. या अपमानास्पद प्रकाराने संतापलेल्या पिडीत महिला कर्मचारीने राज्य महिला आयोग, जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हास्तरीय महिला तक्रार निवारण समितीकडे लेखी तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषद कार्यालयात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. उल्लेखनिय असे की, सहायक प्रशासन अधिकारी दिवाकर खोब्रागडे यांच्यावर यापुर्वी सुध्दा अनेक आरोप असून तिरोडा पंचायत समितीमध्ये इनवर्टर चोरी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा सुध्दा पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आला होता.तो प्रकरणही न्यायप्रविष्ठ आहे.याच सामान्य प्रशासन विभागातील काही कर्मचारी सुद्दा महिला कर्मचारीबद्दल अशासकीय भाषेचा वापर करुन त्यांना वारंवार आपल्या कार्यालयात बोलावून त्रास देत असल्याच्याही चर्चा आहेत.