राष्ट्रीय बाल अधिकारी संरक्षण आयोगाची सुनावणी १९ जुलैला

0
11

जिल्हयातील तक्रारी नोंदविण्याचे जिल्हाधिकारींचे आवाहन
गडचिरोली़,दि.४: मुलांवर होणारे अत्याचार, पिळवणूक अशा विषयांबाबत राष्ट्रीय अधिकार संरक्षण आयोगाची सुनावणी गडचिरोली जिल्हयात १९ जुलै २०१९ रोजी आयोजित करण्यात आली आहे. गडचिरोली मध्ये नागपुर विभागातील सहाही जिल्हयांमधील विविध तक्रारींबाबत सुनावणी घेतली जाणार आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत गडचिरोली जिल्हयातील सर्व स्तरावर आवाहन करुन मुलांबाबत तक्रारी असल्यास १९ जुलै रोजी त्या मांडण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदार स्वत: मुलगा किंवा इतर व्यक्ती, किंवा संस्थाद्वारे तक्रार सादर करु शकतो. गडचिरोली जिल्यातील तक्रारी महिला व बाल विकास विभाग बॅरेक नं.१ , जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नोंदवाव्यात किंवा सुनावणी दिवशी सकाळी ९.०० वा. पासून तक्रारी घेतल्या जाणार आहेत. तक्रारी या प्रामुख्याने मुलांवरील ॲसीड अटॅक , भीक मागणे, मुलावरील अन्याय , अत्याचार, मुलांचे अपहरण, हरविलेली मुल, शाळांच्या वाढलेल्या फी, शाळा बाहय मुल, शाळेसबंधी इतर तक्रारी, मुलांच्या आरोग्याची हेळसांड, मिड डे मिल, बालकांच्या आत्महत्या, बालकांना पोलीसांकडुन मारहान व शाळेत मुलांना मारहान या प्रकारांमधील असाव्यात. मुलांबाबत असलेल्या तक्रारींबाबत आयोग त्याच दिवशी सुनावणी घेवून पुढील प्रक्रिया करणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी संबधित विभाग प्रमुखांची नियोजन बैठक दि.५ जुले २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली आहे. दि.१९ च्या सुनावणीबाबत यावेळी नियोजन केले जाणार आहे.